Ajit Pawar Uddhav thackray and Nana Patole
Ajit Pawar Uddhav thackray and Nana Patole  sarkarnama
मुंबई

राज्यसभेसाठी 'मविआ'ची सावध पावलं; डमी मतपत्रिकेतुन आमदारांना मार्गदर्शन

रश्मी पुराणिक

मुंबई : राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Election) रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या (गुरुवार) विधानभवनाच्या चौथ्या मजल्यावरील मध्यवर्ती सभागृहात, ६ जागांसाठी मतदान होणार आहे. विजयासाठी दोन्ही बाजूला अगदी एक - एक मत महत्वाचं बनलं आहे. सोबत अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांच्या हातात विजयाची चावी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने सावध पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.

या चुरशीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आणि शिवसेनेने आपल्या आमदारांना प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला. त्यासाठी डमी मतपत्रिका तयार करण्यात आली आहे. या मतपत्रिकेवर पक्षाने सांगितलेल्या उमेदवाराला पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीची मत द्यायची आहेत. यासाठी नावापुढे एक किंवा दोन असे लिहायचे आहे.

राज्यसभा निवडणूक घेतलेले, आणि दिल्ली विधानसभेचे माजी सचिव एस के शर्मा म्हणतात, राज्यसभा निवडणुकीत पेनला खूप महत्त्व आहे. मतदानाच्या वेळी जे पेन ठेवले जाते तेच पेन सर्व आमदारांना वापरावे लागते. आमदारांनाही पेन कुणी बदलला नाही ना हे पाहावं लागेल. पेन एकच असेल तर त्याची शाई बदलली नाही का? हे पाहावं लागतं. अन्यथा मत बाद होण्याची शक्यता जास्त असते.

याशिवाय काही राजकीय समीकरणामुळे एखादा आमदार मतदान केल्यानंतर आपले मत जाहीर करतो. या प्रकरणात त्यांचे मत रद्द केले जाते. सहसा, हे तेव्हाच घडते जेव्हा कुठेतरी वाद होते. म्हणजे एक मत इकडे तिकडे गेल्याने सारा खेळ बिघडतो. जे आमदार रिसॉर्ट किंवा हॉटेलमध्ये राहिले नाहीत, ते अचानक आजारी पडू शकतात आणि मतदानाला गैरहजर राहू शकतात. याच सर्व शक्यता लक्षात घेवून काँग्रेस-राष्ट्रवादीकडून आमदारांना प्रशिक्षण देण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT