Rahul Gandhi, Bharat Jodo Yatra Sarkarnama
मुंबई

Bharat Jodo Yatra : सुरक्षा भेदत बांधावर सरसर चढत राहुल गांधींनी युवकांशी साधला संवाद..

Bharat Jodo Yatra :: एकदा थेट समुद्रात उडी मारुन नंतर मच्छीमारांशी त्यांनी संवाद साधला होता. त्यांनी असे करु नये, असे वाटते पण, या माणसाला कुठलीच भीती वाटत नाही,"

सरकारनामा ब्युरो

अतुल पाटील :

Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या नांदेडमध्ये सुरु आहे. महाराष्ट्रातील अनेक बडे नेत या यात्रेत सहभागी झाले आहेत. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा करुन ६० दिवसांनी भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. 'भारत जोडो यात्रे'मध्ये पहिल्या दिवसापासून सहभागी असलेले डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी राहुल गांधी यांच्या यात्रेतील काही किस्से 'सरकारनामा'सांगितले आहेत. (Bharat Jodo Yatra news update)

"विश्रांतीच्या ठिकाणी सह यात्रेकरुंच्या भेटीला राहुल गांधी येतात, त्यावेळी वेगवेगळ्या विषयावर ते बोलतात. त्यांच्या विचारांचा आवाका, अभ्यास प्रचंड आहे. कर्नाटकात एका ठिकाणी ते गप्पा मारत होते. निष्ठा याविषयी बोलताना त्यांनी शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी रायगडाची उभारणी करणारे हिरोजी इंदलकरांचा गौरवाने उल्लेख केला," असे डॉ. रॅपनवाड यांनी सांगितले.

हुलीयार (कर्नाटक) येथे यात्रा होती. त्यावेळी एक प्रसंग रॅपनवाड यांनी सांगितले. ते म्हणाले, " तलावाच्या बांधावरुन काही तरुण 'राहुल.. राहुल..' अशी घोषणा देत होते. या तरुणांकडे राहुल गांधी यांचे लक्ष गेले. त्यांनी सुरक्षा भेदत बांधावर सरसर चढत तिथल्या तरुणांशी संवाद साधला. मागेही एकदा थेट समुद्रात उडी मारुन नंतर मच्छीमारांशी संवाद साधला होता. त्यांनी असे करु नये असे वाटते पण, या माणसाला कुठलीच भीती वाटत नाही,"

भारत जोडो यात्रेत देशभरातून ११८ तर, त्यात महाराष्ट्रातून ९ जण आहेत. त्यामध्ये डॉ. रॅपनवाड यांचा समावेश आहे. दोन हजार इच्छुकांमधून मुलाखतीद्वारे त्यांची निवड करण्यात आली होती.

डॉ. श्रावण रॅपनवाड म्हणाले..

  • तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा करुन ६० दिवसांनी भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील सुरवात भव्य झाली. आंध्रप्रदेशमध्ये यात्रेला म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही. तिथली यात्राही कर्नाटकचे डी. के. शिवकुमार यांनीच सांभाळली. असे असले तरी, तेलंगणामधील नागरिकांच्या स्वागताने आणि सहकार्याने आम्ही भारावून गेलो.

  • ६१ व्या दिवशी महाराष्ट्रात यायचे म्हणून परवा रात्री झोपलोच नाही. मशाल घेऊन चालायचे होते. काहीवेळ चाललो देखील. देगलुरला आल्यानंतर आपल्या माणसांशी भेटता यावे म्हणून मशाल सोबतीच्या हातात देऊन मी आपल्या लोकांच्या भेटीगाठी घेतल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT