Congress Padyatra :  Sarkarnama
मुंबई

Congress Padyatra : भाजपला राज्यातून नेस्तनाबूत करण्यास काँग्रेस सज्ज; 3 सप्टेंबरपासून पदयात्रेला सुरूवात

Loksabha Elections : पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली असून त्यादृष्टीने तयारीही सुरू केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली असून त्यादृष्टीने तयारीही सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात प्रभारी नेमण्यात आले असून त्यांची १६ ऑगस्टला बैठक होणार आहे.या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे. महाराष्ट्रातून भाजप कसा नष्ट होईल, हीच काँग्रेसची भूमिका आहे.त्यासाठी राज्यभरात काँग्रेसकडून पदयात्रा काढण्यात येणार आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या माहितीनुसार,येत्या ३ सप्टेंबरपासून सहा भागात ही पदयात्रा सुरू होईल. गणेशोत्सव आणि नवरात्र संपल्यानंतर पुन्हा ही यात्रा सुरू होईल. आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक पद्धतीने तयारी सुरु केली आहे. विधानासभा निवडणुकीसाठीही याच काळात बैठक होईल. जागा वाटपाला बसू तेव्हा आम्ही भूमिका मांडू.

या पदयात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकार कसा चुकीच्या पद्धतीने कारभार सुरू आहे हे काँग्रेस दाखवून देणार आहे. 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम झाला. त्याचा खर्च कुठून केला? असा प्रश्न उपस्थित करत पटोलेंनी, राज्य सरकार जनतेची लूटत आहे. शानस आपल्या दारी कार्यक्रमातून भाजप जनतेलाच लूटत असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी यावेळी केला.

राज्यात पुन्हा एकदा वज्रमूठ सभाही होणार आहेत का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. एवढ्यात वज्रमूठ सभेचा काही निर्णय झालेला नाही. इंडिया आघाडीची बैठक झाल्यावर नंतर बघू, असे नाना पाटोले यांनी स्पष्ट केलं.अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवरही त्यांनी भाष्य केलं. जो पक्ष भाजपच्या विरोधात लढायला उभा राहील त्याला सोबत घेणार असल्याचं आम्ही आधीच जाहीर केलं आहे. शरद पवार आमच्यासोबत आहेत. शरद पवार यांनीच तसे जाहीर केलं आहे, असे पटोले यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT