Sushma Andhare Narendra Modi  sarkarnama
मुंबई

Sushma Andhare Video : 'नरेंद्र मोदींचा जीव काँग्रेसने वाचवला, नाहीतर पांगुळगाडा...', सुषमा अंधारेंचा रवींद्र चव्हाणांवर पलटवार

Narendra Modi Ravindra Chavan : कोव्हिड काळात नरेंद्र मोदींनी दिलेल्या लसीमुळे सर्वांचा जीव वाचल्याचा दावा रवींद्र चव्हाण यांनी केला होता. त्याला सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

Roshan More

Sushma Andhare News : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या कोव्हिड लसीमुळे आपला जीव वाचला. आपण आज जिवंत आहोत ते मोदीजींनी दिलेल्या लसीमुळे असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

सुषमा अंधारे म्हणाल्या, 'चाराने की मुर्गी और बाराणे का मसाला कसा बनवायचा हे भाजपवाल्यांकडून शिकलं पाहिजे. जाहिरातीमध्ये यांचा कोणी हात पकडू शकत नाही. रवींद्र चव्हाणांना कोण सांगणार की तुम्ही एक लस दिली त्याचे देखील तुम्ही पैसे घेतले.'

'एका लसीचे साडेसातशे रुपये मोजले, दोन लशींचे मिळून मी स्वत: 1500 रुपये मोजले आहेत. आणि तुम्ही त्याच्यावर मोदीजींचा हासरा फोटो छापला आहे. पण काँग्रेसने 14-14 लशी दिल्या आणि एकदाही जाहिरात केली नाही. म्हणजे रवींद्र चव्हाणांसकट नरेंद्र मोदींजींचा जीव कोणी वाचवला असेल तर तो काँग्रेसने वाचवला. जर पोलिओची लस मिळाली नसती तर आपण सगळे पांगूळगाडा घेऊन फिरलो असतो. ', असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला.

'पोलिस, देवी, गोवर, धर्नुवात, ट्रिपल एच अशा 14 प्रकराच्या लशी काँग्रेसने दिल्या पण त्यांनी जाहिराती केल्या नाही. पण भाजप जाहिराती करण्यात पटाईत आहे.

...त्याचे श्रेय टोपे, ठाकरेंचे

पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या की, कोव्हिडच्या काळात मुंबईत काय काम झाले हे सांगितले पाहिजे. कोव्हिडचा सर्वाधिक धोका मुंबईत, धारवित होता. पण सर्वातआधी कोव्हिड धारावित आटोक्यात आला. त्याचे श्रेय तत्कालीन राष्ट्रवादीचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि कुटुंबप्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT