मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी गुरूवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. महाराष्ट्रात सध्या विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. एका जागेवर काँग्रेसकडून दिवंगत खासदार राजीव सातव (Raveev Satav) यांच्या पत्नी प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
पटोले यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी फडणवीसांची भेट घेत असल्याची चर्चा होती. या भेटीनंतर पटोले यांनीच याबाबत खुलासा केला आहे. भाजपकडून या जागेवरुन औरंगाबाद भाजप (BJP) अध्यक्ष संजय केणेकर (Sanjay Kenekar) यांना रिंगणात उतरवलं आहे. केणेकर यांनी उमेदवारी अर्जही देखील दाखल केला आहे. केणेकर उमेदवारी अर्ज मागे घेवून सातव यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी पटोले यांनी केल्याचे समजते.
यावर बोलताना पटोले म्हणाले, राजीव सातव यांच्या पत्नीला तिकीट दिले आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मी फडणवीस यांना भेटलो. निवडणूक बिनविरोध करण्याची राज्याची परंपरा आहे. देवेंद्र फडणवीस ते पक्षात चर्चा करून याबाबत निर्णय घेतील. चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे मत मांडले आहे. आम्ही मन वळवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे पटोले यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या निवडणूकीसाठी 10 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 14 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा पोटनिवडणूकीत काँग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपनेही आपला उमेदवार मैदानात उतरवला होता. सोबत अखेरच्या काही दिवसापर्यंत हा अर्ज माघारी न घेण्यावर भाजपचे नेते ठाम होते. मात्र त्यानंतर मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे नेते आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजपकडून संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला होता. आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजप काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.