Nana Patole Latest News
Nana Patole Latest News sarkarnama
मुंबई

काँग्रेसच ठरलं; आता नाना पटोले जाणार अयोध्येला

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) ५ जून आणि त्यापाठोपाठ १० जूनला शिवसेना (Shivsena) नेते व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यानंतर आता काँग्रसेचे (congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे देखली अयोध्येचा लवकरच दौरा करणार आहेत. (Nana Patole Latest News)

नाना पटोले यांची अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत बृजमोहन दास यांनी आज टिळक येथे भेट घेऊन त्यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले. नाना पटोले यांनी त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला. त्यामुळे तेही लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नुकतेच अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेतले. राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यानंतर आता पटोले यामुळे राज्यात अयोध्येला जाण्याची स्पर्धा लागली का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

राज्यातील प्रमुख पक्षांकडून हिंदु मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी अयोध्या दौऱ्यांचे नियोजन करण्यात येत असल्याची चर्चा आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेनंतर आपला ट्रक बदलत हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला आहे. मशिदींवरील भोंगे असतील किंवा हनुमान चालिसा, हनुमान आरती असेल यामुळे काही दिवसांपासून राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यानंतर झालेल्या सभेमध्ये मनसेने त्यांना हिंदुजननायक असे संबोधले. त्याच बरोबर त्यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. त्यामुळे शिवसेनेनेही आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याची घोषणा करत अयोध्येमध्ये बॅनर्स झळकावले आहेत. "असली आ रहा, नकली से सावधान" असे म्हणत राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

त्यातच भर म्हणून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या 'मातोश्री' या निवास्थानासमोर हनुमान चालिसा म्हण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईत झालेल्या बुस्टर टोस सभेमध्ये बाबरी मशिद पाडतांना आपण उपस्थित होते. त्यासाठी आपल्याला तुरुगंवासही झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिवसेनेचे कोणीच तेथे उपस्थित नव्हते, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. फडणवीस यांना शिवसेने ही जोरदार प्रत्युत्तर देत बाळासाहेब ठाकरे यांचे व्हिडीओ सोशल मीडियार व्हायरल केले. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्यावरुन व आम्हीच हिंदुत्वाचे कैवारी आहोत, असे मतदारांना सांगण्याचा आटोकाट प्रयत्न पक्षांकडून सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून अयोध्या दौऱ्यांचे जोरदार नियोजन केले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT