Ambadas Danve  Sarkarnama
मुंबई

अंबादास दानवेंचं वादग्रस्त वक्तव्य, विरोधकांना दिली 'रावणा'ची उपमा!

Ambadas Danave : "नवरात्रीमध्ये दुर्गा पूजानंतर दहाव्या दिवशी रावणाचा दहन केला जातो."

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्यातील सत्तासंघर्ष न्यायालयीन पातळीवर सुरू आहे. मात्र दोन्ही बाजूंनी एकमेकांवर वार प्रतिवार सुरू आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी आता एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दानवे यांनी विरोधकांना थेट रावणाची उपमा दिली आहे.

दानवे म्हणाले, "या महाराष्ट्रात जे महिशासुर निर्माण झालेले आहेत, त्यांचा नायनाट करण्याची शक्ती निश्चित दुर्गे मध्ये आहे. ती शक्ती देवतेने द्यावी अशी प्रार्थना देवीला केली आहे. नवरात्रीमध्ये दहा दिवस दुर्गेची पूजा केली जाते, दहाव्या दिवशी रावणाचा दहन केलं जातो आणि जे या शक्ती देवतेच्या विरोधात आहेत, हे रावणाचीच प्रतिमा आहेत."

शक्ती देवता ही सामान्य जनतेची आहे, ती शिवसेनेची आहे, बाळासाहेबांची आहे, उद्धव ठाकरे यांची आहे. यांच्या विरोधात जे लढतायत ते रावण आहेत, अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्षपणे, नाव न घेता विरोधकांना रावणाची उपमा दिली आहे.

यावेळी त्यांनी राज्यातील सत्तासंघर्षावरही दानवेंनी प्रतिक्रीया दिली आहे. निकालाचं काही टेन्शन घेण्याचं गरज नाही. फक्त कोर्ट बदललेला आहे. निवडणूक आयोग कोणाच्या घरचा नाही. ती एक स्वायत्त संस्था आहे. निश्चित तिथे सुद्धा आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास दानवेंनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT