Mumbai Marathi Dispute Sarkarnama
मुंबई

Mumbai Marathi Dispute : मराठी युवकांना नोकऱ्यांमध्ये 'नो-एन्ट्री'; मुंबईत गुजरातच्या कंपनीच्या जाहिरातीने मराठीचा मुद्दा तापणार

Gujarat company in Mumbai rejects job to Marathi youth : मुंबईत असलेल्या एका गुजरातच्या कंपनीने नोकरभरतीची जाहिरात काढली आहे. परंतु नोकरीसाठी मराठी उमेदवारांनी अर्ज करू नके, असे नमूद केल्याने वाद चिघळला आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : मुंबई कोणाची? असा एकेकाळी केला जायचा. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी, यावर खणखणीत उत्तर देत मुंबई ही मराठी माणसांची असल्याचे ठणकावून सांगितले. परंतु आज मुंबईत मराठी माणसांची हवलेना होत असल्याचे प्रकार समोर येत आहे.

मुंबईत नोकऱ्यांमध्ये मराठी युवकांना 'नो-एन्ट्री' केली जात आहे. गुजरातच्या एका कंपनीने नोकरीसाठी अशीच जाहिरात प्रसिद्ध केली असून, त्यावर मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये, असे म्हटल्याने वाद सुरू झाला आहे. राजकीय संघटना यावर आक्रमक होताना दिसत असून, मुंबईत पुन्हा मराठी माणूसविरुद्ध गुजरात, असा वाद पेटण्याची चिन्हं आहे.

मुंबई अंधेरी भागातील मरोळ इथं कार्यालय असलेल्या गुजरामधील एका गोल्ड कंपनीने वेबसाईटवर व्यवस्थापन पदासाठी जाहिरात दिलीय. या जाहिरातीनुसार फक्त पुरूष उमेदवार आणि 'नॉन महाराष्ट्रीय' (अमराठी) उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतील, असा उल्लेख जाहिरातीमध्ये आहे. ही जाहिरात आता मुंबईसह राज्यात समाज माध्यमांवर व्हायरल होवू लागली आहे. त्यामुळे मराठी युवकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या जाहिरातीवरून मुंबईतील मराठीचा मुद्दा लावून धरणाऱ्या राजकीय संघटना आक्रमक झाल्या आहे. शिवसेना आणि मनसे (MNS) मराठी माणसांसाठी नेहमीच लढत असते. परंतु सध्या राज्यात पूरस्थिती आहे. राजकीय संघटना आणि प्रशासन पूरस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. परंतु काही सामाजिक संघटनांनी हा मुद्यावरून आक्रमक रूप धारण करण्यास सुरवात केली आहे.

मुंबई देशाचे आर्थिक केंद्र असून महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईत परप्रांतातून लाखो लोक इथं नोकरीनिमित्ताने येतात आणि आहेत. लाखो परप्रांतीय मुंबई वास्तव्य करतात. मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. त्यामुळे इथल्या नोकऱ्यावर मराठी माणसाला प्राधान्य मिळाले पाहिजे. असे असताना देखील काही कंपन्या जाहिरपणे मराठी माणसाला नोकऱ्यांमध्ये डावलत आहे. जाहिरातीमध्ये देखील तसा थेट उल्लेख करत आहे. एकप्रकारे मराठी माणसाची अवहेलना सुरू असल्याचे दिसते. मराठी माणसांना नोकरी नाकारणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाईची मागणी मुंबईतून होऊ लागली आहे.

मुंबईत मराठी माणसाला डावल्याचे प्रकार यापूर्वी देखील झाले आहे. घाटकोपरमधील एका गुजराती सोसायटीमध्ये मराठी पत्रक वाटल्यास कारवाई होईल, असे म्हटल्याने वाद निर्माण झाला होता. याच सोसायटीमध्ये मराठी माणसाला लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यास रोखल्याने संतापाची लाट उसळली होती.

गिरगावतील एका आयटी कंपनीने नोकर भरतीत मराठी लोकं नकोत, असे जाहीर करत वाद ओढावून घेतला होता. या कंपनीविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. राजकीय नेत्यांनी देखील मराठी माणसांविषयी अनेकदा वक्तव्य केलीत. त्यावरून वाद निर्माण देखील झाले. परंतु असे प्रकार वारंवार होत असल्याने मराठी माणसांची अवहेलना थांबेनाशी झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT