China Corona : sarkarnama
मुंबई

Corona News : कोरोनाने वाढवली डोकेदुखी : परदेशातून मुंबईत आलेले दोन प्रवासी पॉझिटिव्ह

Corona News : अन्य सात प्रवाशांचा अहवाल येणे बाकी आहे.

सरकारनामा ब्यूरो

Corona News : चीन, जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि ब्राझीलसह जगभरात कोरोनाने डोके वर काढले आहे. चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.चीनमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत भारतही कोरोनाबाबत अलर्ट मोडमध्ये आला आहे. भारतातही २४ तासांत २१४ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी ४ जणांचा मृत्यूही झाला आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर शुक्रवारी येथे 32 नवीन रुग्ण आढळून आले.

केंद्र सरकारने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, 11 दिवसांत देशातील 124 आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये ओमिक्रॉनचे 11 उप-प्रकार आढळले आहेत. 23 डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियाहून एक 38 वर्षीय महिला मुंबईत आल्यावर सर्वप्रथम खळबळ उडाली होती. ही महिला मुंबईहून जबलपूरला गेली. तिला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. संबंधित महिलेचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. महिलेच्या नातेवाईकांचे नमुनेही जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

ओमायक्रॉन बी १.१ व्हेरिएंटची लागण झालेले परदेशातून आलेले दोन प्रवासी मुंबई विमानतळावर आढळले आहेत.‌ मुंबई विमानतळावरील आरटीपीसीआर चाचणीत दोन प्रवासी करोना बाधित आढळले होते. या ९ प्रवाशांचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे तपासणीसाठी पाठवले असता दोन प्रवाशांना ओमायक्राॅन बी १.१ ची लागण झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. तर अन्य सात प्रवाशांचा अहवाल येणे बाकी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT