Corona restrictions in Maharashtra
Corona restrictions in Maharashtra 
मुंबई

राज्यात पुन्हा निर्बंध; अस्लम शेख यांचा इशारा

सरकारनामा ब्युरो

Covid 19 latest news update in Maharashtra

मुंबई : दोन वर्षांच्या कालावधीनंतर राज्याला कोरोना (Covid 19) निर्बंधांपासून मुक्ती मिळाली. पण अजूनही शेजारच्या चीनसह काही देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. तर काही दिवसांपासून राजधानी दिल्लीतही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. याच पार्श्वभुमीवर राज्य सरकारने (Mahavikas aghadi) नागरिकांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागल्याने नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यांनंतर आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील निर्बंधांची शक्यता वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून राज्य सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जर दैनंदिन रुग्णसंख्या एक हजाराच्या वर गेली तर राज्यात पुन्हा निर्बंध लागू करावे लागतील, असे मंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

गुरुवारी (२६ मे) राज्यात पाचशेहून अधिक नवीन प्रकरणांची नोंद झाली. तर मुंबईत रुग्णसंख्येने तीनशेचा टप्पा ओलांडला आहे. बीएमसीने सप्टेंबर महिन्यात चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे चौथ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर महापालिकेने त्यांच्या सर्व जंबो कोविड-१९ सुविधा किमान सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार असल्याचे आधीच सांगितले आहे.

“ज्या गतीने रुग्णांमध्ये वाढ होत आहेत ते पाहता निर्बंध आणावे लागतील. तर विमानसेवेत अद्यापही निर्बंध कायम आहेत. लोकांनी काळजी घेतली नाही तर निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येणार नाही,” असा इशाराही अस्लम शेख यांनी दिला आहे.

राज्यातील करोनाच्या वाढत्या रुग्णां पाहता, राज्यातील लसीकरणासाठी पात्र असलेल्या १० कोटी लोकसंख्येपैकी फक्त ७० टक्के लोकांनीच आतापर्यंत लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. अजूनही ३० टक्के लोकांनी अजूनही लसीचा दूसरा डोस घेतलेला नाही. कोरोनाची संसर्गाची तीव्रता रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे, हे निरीक्षणातून सिद्ध झाले आहे. असं असतानाही अनेकजण लसीकरण गांभीर्याने घेत नाहीत.

राज्य लसीकरण अधिकारी डॉ.सचिन देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी १६ जानेवारी २०२१ पासून राज्यात लसीकरण मोहिम सुरू झाली. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम लसीकरण करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने कोरोना महामारीत आघाडीवर काम करणारे कर्मचारी, त्यांच्यानंतर ६० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांपासून १२ वर्षांच्या मुलांपर्यंत लसीकरण सुरू करण्यात आले. मग राज्यात ४५ पेक्षा जास्त वय असलेल्यांच्या गटातील लोकांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT