BJP MP Ranjitsingh Naik Nimbalkar
BJP MP Ranjitsingh Naik Nimbalkar 
मुंबई

आळंदी-पंढरपूर महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार; सीबीआय चौकशी करा : रणजितसिंह निंबाळकर

सरकारनामा ब्यूरो

फलटण शहर : माढा लोकसभा मतदारसंघात पालखी मार्गासाठी जमीन अधिग्रहण करताना नगरपंचायत जमिनीला एक दर व त्याच्याजवळ 100 मीटरवर असणाऱ्या जमिनीस जादा मोबदला मिळत आहे. हा भेदभाव कशासाठी, याची चौकशी करावी तसेच महामार्ग निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. त्याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी संसदेच्या अधिवेशनात केली आहे.

आळंदी-फलटण-पंढरपूर असा 250 किलोमीटरचा विस्तारित पालखी महामार्ग मंजूर झाला असून, यासाठी जमीन अधिग्रहण करण्याचे प्रक्रियेमध्ये दिला जाणारा जमिनीच्या मोबदल्यामध्ये भेदभाव केला जात आहे. माळशिरस तालुक्‍यात एक गुंठा जमिनीला एक लाख रुपये दर, तर तिथूनच 100 मीटरवर चार लाख रुपये दर दिला जात आहे.

हा भेदभाव मिटवून सर्व शेतकऱ्यांना समान दर देण्यात यावा, असे स्पष्ट करून महामार्ग निर्मिती प्रक्रियेत सांगोला, माढा, करमाळा येथील अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. त्याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी खासदार निंबाळकर यांनी संसदेत केली. 

माढा मतदारसंघात माळशिरस परिसरातील शेतकरी बांधवांना अधिग्रहण प्रक्रियेत योग्य मोबदला मिळत नाही. या प्रक्रियेत अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार सुरू असल्याच्या तक्रारी खासदार निंबाळकर यांच्याकडे शेतकरी व ग्रामस्थांकडून होत होत्या. त्या संदर्भातच आज लोकसभेत खासदार निंबाळकर यांनी प्रश्न उपस्थित करून चौकशीची मागणी केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT