Anant Ambani karan Adani
Anant Ambani karan Adani Sarkarnama
मुंबई

Anant Ambani : राज्याच्या आर्थिक सल्लागार परिषेदेत अंबानी-अदानींच्या मुलांचा समावेश ; चर्चांना उधाण!

सरकारनामा ब्यूरो

Council of Economic Advisers : राज्य शासनाला आर्थिक स्तरावर व अन्य सबंधित मुद्द्यांवर सल्ला देण्यासाठी राज्य सरकारने 'आर्थिक सल्लागार परिषद' स्थापन केली आहे. या परिषदेत एकूण २१ सदस्यांची निवड केली आहे. परिषदेचे अध्यक्षपद टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्याकडे देण्यात आले आहे. मात्र यातील विशेष बाब म्हणजेरिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे पुत्र व अनंत अंबानी आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे पुत्र करण अदानी यांचा या परिषेदेवर समावेश करण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

अनंत अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक आहेत तर, करण अदानी हे अदानी पोर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. या दोघांचाही राज्याच्या 'आर्थिक सल्लागार परिषदेवर' समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा होताना दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. भारताची अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत पाच लाख कोटी अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्था गाठण्याचं ध्येय त्यांनी बोलवून दाखवलं होतं. पाच लाख कोटी अमेरिकन डॉलरपर्यंत पोहचायचं असेल तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ लाख कोटीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट सरकारने बाळगले आहे. परिणामी हे उद्दिष्ट पूर्ण करताना राज्याचे देशांतर्गत उत्पादन पुढील ५ वर्षांत वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आराखडा ही आर्थिक सल्लागार परिषद तयार करणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT