Anil Deshmukh  Sarkarnama
मुंबई

न्यायालयात आज सुनावणी : अनिल देशमुखांना जामीन मिळणार ?

Anil Deshmukh : सीबीआयनंतर ईडीने देशमुखांवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय येतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयात अनिल सिंग हे ईडीच्या वतीने बाजू मांडत आहेत. यावर काही वेळातच निर्णय येण्याची शक्यता आहे.

सीबीआयनंतर ईडीने देशमुखांवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. उच्च अधिकाऱ्यांची बदली आणि पोस्टिंग याबाबत पैशांच्या वसुलीची ही सर्व प्रकरणे देशमुख यांच्यावर दाखल आहेत. या प्रकरणाचा ईडी तपास करत असून, न्यायालयाकडे अनेक पुरावे सादर केले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांवर देशमुखांकडून पैसे वसूल करण्यासाठी दबाव होता, असाही गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे.

जून 2021 पासून अनेक समन्स पाठवूनही देशमुखांच्या बाजूने संबधित यंत्रणांना कोणताही प्रतिसाद आलेला नाही.समन्सला प्रतिसाद नाही आणि कागदोपत्रांचीही पुर्तता केलेली नाही, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आले आहे. 2 नोव्हेंबर रोजी देशमुख यांना अटक करण्यात आली होती. अनेक समन्सनंतर ते ईडी कार्यालयात हजर झाले.

गृहमंत्री असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला. पोलिस अधिकाऱ्यांवर पैसे वसूल करण्याचा त्यांचा दबाव होता. आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनेमध्ये पदाचा गैरवापर करून, दबाव निर्माण करण्यात आला, असे आरोप देशमुखांवर ठेवण्यात आले आहेत. अटकेनंतर ईडीने तपास करून, या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहेत.

ईडीच्या आरोपानुसार, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेने बार चालू ठेवण्यासाठी मुंबईतील बारमालकांकडून ४.७ कोटी रुपये उकळले आणि ही रक्कम देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांच्याकडे सुपूर्द केली. तपासात असे समोर आले आहे की, हवाला चॅनेलद्वारे पैसे दिल्लीमधील सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले गेले होते. या दोघांवर बनावट कंपन्या चालवण्याचा आरोप आहे. जैन बांधवांनी हे पैसे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केल्याचा आरोप आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT