Sanjay Raut|  
मुंबई

राऊतांच्या जामीन प्रकरणी न्यायालयाने ईडी'ला पुन्हा फटकारले अन् दिले 'हे' निर्देश

Sanjay Raut| पत्राचाळ घोटाळाप्रकरणातील पीएमएलए कोर्टाने संजय राऊत (Sanjay Raut) यांना 100 दिवसानंतर जामीन मंजूर केला.

सरकारनामा ब्युरो

Sanjay Raut : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा जामीन रद्द करण्यासंदर्भात ईडीने आज पुन्हा याचिका दाखल केली होती. पण मुंबई उच्च न्यायालयाचे (High Court) न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावणी घेण्यास साफ नकार दिला आहे. तसेच ईडीला दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश दिले.

पत्राचाळ घोटाळाप्रकरणातील पीएमएलए कोर्टाने संजय राऊत (Sanjay Raut) यांना 100 दिवसानंतर जामीन मंजूर केला. हा जामीन मंजूर करताना न्यायालयाने दिलेल्या अंतरीम निकालपत्रात संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचे नमुद केले. त्यानंतर आज ईडीने राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी पुन्हा याचिका दाखल केली होती. राऊत यांच्याविरोधात पुरावे असतानाही सत्र न्यायालयाने त्यांना जामीन दिल्याचं सांगत ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण उच्च न्यायालयानेही त्यावर सुनावणी घेण्यास साफ नकार दिला.

तसेच, राऊत यांना जामीन मंजूर करताना या प्रकरणातील म्हाडाची भूमिका संशयास्पद वाटत आहे. तरीही म्हाडाचा कुठलाही कर्मचारी आरोपी नाही. मात्र, प्रवीण राऊत यांना दिवाणी वादासाठी अटक केली आहे. जबाबदार एचडीआयएल, म्हाडा आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई केलेली नाही. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाधवान बंधू यांना देखील अटक केलेली नाही. प्रवीण राऊत यांना देखील दिवाणी वादासाठी अटक केली. त्यानंतर संजय राऊत यांना अटक करण्यात आली. मात्र, ही अटक बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मुख्य आरोपांना सोडून ईडीने इतरांनाच अटक केली, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

विशेष न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केल्यानंतर ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, उच्च न्यायालयाने ईडीला फटकारले. मुंबई उच्च न्यायालयात तातडीने या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच कार्यालयीन प्रक्रियेच्या विरोधात जाऊन सुनावनी करू शकत नाही, असेही सांगितले. उदया सकाळी या जामीनासंदर्भात सुनावनी करु, असेही न्यायालयाने सांगितले. सत्र न्यायालायने महिनाभर ऐकून निर्णय दिला आहे. त्यावर १० मिनिटात निर्णय देण योग्य नाही, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच तुम्ही गुणवत्तेच्या आधारावर युक्तीवाद करा. एका दिवसाने काय होणार आहे, असा सवाल उच्च न्यायालयाने ईडीला केला. या प्रकरमाणुळे पुन्हा एकादा राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT