Maharashtra Political Crises Sarkarnama
मुंबई

Maharashtra Political Crises news Update : ठाकरेंची याचिका तातडीने दाखल करुन घेण्यास न्यायलयाचा नकार...

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Political Crises news Update : निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या वतीने आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार होती. मात्र न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका तातडीने दाखल करुन घेण्यास नकार दिला आहे. याचिका दाखल करण्यासाठी उद्या या असे न्यायालयाकडून ठाकरे गटाला सांगण्यात आले आहे.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात उद्या, सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय ठाकरे गटाच्या वतीने घेण्यात आला. या निर्णयावर आम्ही न्यायालयात जाणार आहोत, आम्ही सर्वेोच्च न्यायालयात याला आव्हान देवू. धनुष्यबाण तुम्ही घेऊ शकणार नाही. तु्म्ही धनुष्यबाण काही काळ चोरू शकता. धनुष्यबाण चोरल्याचा आनंद त्यांना घेऊ द्या. शिवसैनिकांनो कुठेही खचू नका, मी खचलो नाही.. शिवसेनाचा विजय होईल, आता विजयाशिवाय माघार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी, आमदार, खासदारांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी आयोगाच्या निकालानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. आयोगाने एकतर्फी निर्णय दिल्याने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय झाला.

तसेच, येत्या २७ फेब्रुवारीपासून मुंबईत सुरु होणाऱ्या राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गट पक्षादेश अर्थात व्हीप जारी करील, असाही मुद्दा चर्चेत आला. पण, न्यायालयात पक्षाचा वाद प्रलंबित असताना व्हीप बजावता येत नाही, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT