Police Covid Hospital In satara
Police Covid Hospital In satara 
मुंबई

एसपींचा पुढाकार; साताऱ्यात पोलिसांसाठी कोविड हॉस्पिटल

सरकारनामा ब्यूरो

 सातारा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखताना पोलिस कर्मचारी व अधिकारीही कोरोनाबाधित होत आहेत. हे लक्षात घेऊन त्यांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या पुढाकारातून साताऱ्यात पोलिसांसाठी कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. 35 बेडच्या या हॉस्पिटलमध्ये 50 टक्के बेड पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी तर उर्वरित 50 टक्के बेड हे सर्वसामान्य नागरीकांना उपलब्ध होणार आहेत. 

या पोलिस कोविड हॉस्पिटलचे उद्‌घाटन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झाले.

या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर, हायफ्लो ऑक्सिजन, ऑक्सिजन बेड, साधारण बेड, एक्स रे मशिन, ईसीजी मशीन, कार्डीयाक ॲम्बुलन्स (२४ तास उपलब्ध) आदी सुविधा असणार आहेत. सद्य परिस्थितीमध्ये 35 बेडची क्षमता असून उपलब्ध बेड संख्येपैकी ५० टक्के बेड हे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता राखीव व ५० टक्के बेड हे नागरिकांकरिता उपलब्ध होणार आहेत.

दर पंधरा दिवसांनी बेड उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात येणार असून आढाव्याअंती पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत.  सातारा मेडिकल असोसिएशन मधील एकूण अकरा डॉक्टर्सचा समूह यांचे व्यवस्थापन पाहणार असून काही पूर्णवेळ तर काही व्हीसीटिंग फॅकल्टी असणार आहेत. तीनशिफ्टमध्ये काम चालणार आहे.

 या उद्घाटनप्रसंगी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, कोल्हापूर परीक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपवनसंरक्षक भरतसिंह हाडा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण तसेच सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT