Pravin Darekar 
मुंबई

दरेकरांनी आदित्य ठाकरेंना सुनावले : तेव्हा संवाद केला असता तर वादच निर्माण झाला नसता

भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई - शिवसेनेचे युवा नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात सभा घेतली. यात त्यांनी शिवसैनिकांना आवाहन केले. या संदर्भात भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ( Darekar told Aditya Thackeray: Had there been dialogue then, there would have been no controversy )

प्रवीण दरेकर म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी राज्याचे मंत्री अथवा शिवसेना प्रमुखांचे चिरंजिव म्हणून महाराष्ट्रभर फिरले असते तर आता संवाद करण्यापेक्षा तेव्हा संवाद केला असता तर वादच निर्माण झाला नसता. या निमित्तका होईना पण ते पक्ष बांधणीसाठी बाहेर पडत आहेत. हे काही नसे थोडके, असा टोलाही त्यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, ठाण्यात जाऊन एकनाथ शिंदेवर टीका करणे हे ठाण्यातील लोकांना कितपत रुचेल हे मला माहिती नाही. पण ठाण्याच्या कानाकोपऱ्यात एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांचा आदर्श घेऊन, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन त्याठिकाणी सामाजिक सेवा मोठ्या प्रमाणावर केली. जे काही संघटन दिघे यांच्यानंतर बांधले आहे. ते एकनाथ शिंदेंनी बांधले आहे. विकासकामे केली. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या आरोपांना ठाण्यात महत्त्व अथवा जनाधार लाभणार नाही, असे भाकीतही त्यांनी केले.

दोन लोक अतिशय सक्षम आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदेही मंत्री होते. दोघांच्याही क्षमता आहेत. ते योग्यवेळी मंत्रिमंडळ विस्तार करतील. त्यामुळे काही काम अडत नाही. त्यांनी सत्ता संभाळल्यापासून लोकहिताचे अनेक निर्णय झाले आहेत. मागील अडीच वर्षांपेक्षा मागील एक महिन्यात जास्त काम झाले, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

पक्षवाढीसाठी लोकांत जावे लागते

काँग्रेस हतबल झाले आहे. लोकांमध्ये जाऊन लोकांसाठी काम करण्याची धमक व क्षमता त्यांच्यात राहिलेली नाही. रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम करताना ते दिसत नाहीत. त्यामुळे प्रसारमाध्यमांसमोर येऊन टीका टिपण्णी करणे, पंतप्रधान मोदींना दोष देणे हे त्यांना सोपे काम वाटते. पक्षवाढीसाठी लोकांमध्ये जावे लागते. लोकांचा विश्वास संपादन करावा लागतो. तशा प्रकारची धमक काँग्रेसमध्ये राहिलेली नाही. ते पोपटपंची शिवाय काही करत नाहीत, अशी टीकाही त्यांनी नाना पटोले यांचे नाव न घेता केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT