Mumbai News : दर्शना पवार हत्या प्रकरणामध्ये आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. दर्शनाचा मित्र राहुल हंडोरे याला बेड्या ठोकण्यात आले आहेत. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी दर्शना पवार हिची हत्या करण्यात आली होती. दर्शना राजगडावर गेली तेव्हा तिच्यासोबत आरोपी राहुल हंडोरे होते. मात्र गडावरून परतताना राहुल एकटाच होता. दर्शनाचा मृतदेह आढलल्यापासून आरोपी राहुल हा फरार होता. पुणे ग्रामीण पोलीस दलाची पाच पथके राहुलचा शोध घेत होते. अखेर राहुल हंडोरे (Rahul Handore) याला बेड्या ठोकण्यात आले आहेत. (Darshana Pawar Death Case Update )
दर्शनाची पवारची हत्या राहुल हंडोरेनेच केली हे पोलीस तपासाकत स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत आरोपी राहुल हंडोर पोलीसांना गुंगारा देत फरार होत होता. देशातील अनेक राज्यातून तो फिरत होता. मध्य प्रदेश, पश्चिुम बंगाल, हरियाणा इथे तो फिरत होता. पुणे ग्रामीण पोलीसाचीपाच पथके त्याच्या मागावर होती. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आले आहे.
वेगवेगळ्या राज्यांमध्ये पुणे ग्रामीण पोलिसांची पाच पथके आरोपीच्या मागावर होते. अखेर मुंबईमध्ये आरोपी राहुलला पकडण्यात पुणे पोलिसांना यश आलेले आहे. त्यानेच हे हत्या केल्याची आरोपीने कबुली दिली आहे.
पुण्यात हे दोघेही राज्य सेवा आयोगाची परिक्षा देण्यासाठी तयारी करत होते. त्याचसोबत दर्शना आणि आरोपी राहुल हे एकमेकांचे नातेवाईक देखील आहेत. ते एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. दर्शनाची हत्या केल्यानंतर आरोपी राहुल फरार झाला होता.
पुण्यातील एका संस्थेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभानंतर दर्शना पवार ही ९ जून रोजी कोपरगाव (Kaoargaon) येथून पुण्याला गेली होती. हा सत्कार समारंभ पार पडल्यानंतर ती पुण्याजवळील नऱ्हे परिसरात एका मैत्रिणीकडे राहत होती. १२ जून रोजी सिंहगडावर (Sighgad) फिरायला जात असल्याचे मैत्रिणीला सांगून ती घराबाहेर पडली. दर्शनाने आपल्या कुटुंबीयांनाही याबाबत माहिती दिली होती.
दर्शना हिच्यासोबत तिचा एक मित्र आरोपी राहुल हंडोरे हा देखील होता. १२ जूनला दर्शनाच्या कुटुंबीयांनी संपर्क साधल्यावर तिचा मोबाईल बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. मात्र, तिचा ठावठिकाणा न लागल्याने कुटुंबीयांनी दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रोड पोलिस ठाण्यात (Pune Police) दिली. रविवारी (१८ जून) दर्शना पवार हिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात (Velhe Taluka) असणाऱ्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी सतीचा माळ या परिसरात सापडला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.