Dasara Melava latest news
Dasara Melava latest news sarkarnama
मुंबई

Dasara Melava : ठाकरेंचे भाषण हे नळावरील भांडणाप्रमाणे, नुसतीच "उणी-धुणी" ; मनसेनं उडवली खिल्ली

सरकारनामा ब्युरो

पुणे : अनेक दिवसापासून चर्चेत असलेले दोन दसरा मेळावे (Dasara Melava)काल (बुधवारी) उत्साहात झाले. गेल्या महिन्याभरापासून शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे शिवाजी पार्कसाठी मुंबई उच्च न्यायालयापर्यंत गेले. शेवटी उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली.दोघांनी एकमेकांवर ताशेरे ओढले. (Sandeep Deshpande latest news )

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाऊण तासाच्या भाषणात हिंदूत्वाच्या मुद्यावरून भाजपा आणि शिंदे गटाला लक्ष्य केलं. उद्धव ठाकरेंची अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांनी मशिदींना भेट दिल्याच्या मुद्द्यापासून ते नामांतरणापर्यंतचे मुद्द्यांचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली. उद्धव यांच्या या भाषणावर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पहिली प्रतिक्रिया नोंदवण्यात आली आहे.

बुधवारच्या सभेनंतर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया मनसे नेते, माजी नगरसेवक संदीप देशपांडे (Sandeep Deshpande)यांनी एक टि्वट करीत सभेवर भाष्य केलं आहे. राज ठाकरेंच्या निकटवर्तीयांपैकी एक असणाऱ्या देशपांडे यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणातील अनेक मुद्दे हे नळावरील भांडणाप्रमाणे होते असा टोला देशपांडेंनी लगावला आहे.

उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामधून उणीधुणी काढल्याचा शाब्दिक चिमटा देशपांडेंनी काढला आहे. काल सभा झाल्यानंतर रात्री हे टि्वट केले होते. आज सकाळी देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओ आपल्या टि्वट हॅडलवरुन पोस्ट केला आहे.एका खाजगी वृत्तवाहिनीवर झालेल्या मुलाखतीचा काही भाग या टि्वटमध्ये आहे. यात ठाकरे हे कॉंग्रेसवर टीका करताना दिसत आहेत. "बोले जैसा चाले त्याची वंदावी पाऊले," अशा शब्दात त्यांनी ठाकरेंना टोला हाणला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकूण दीड तासाच्या भाषणात पहिला तासभर सर्व जुने मुद्दे उगाळले. पण शिवतीर्थावर उद्धव यांच्या भाषणातील टीका समोर आल्यावर अखेरच्या अर्ध्या तासात एकनाथ शिंदेंना सूर सापडला. त्यांनी हिंदुत्व, आनंद दिघे, महाविकास आघाडी, शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी प्रतारणा यावरून उद्धव यांच्यावर कठोर हल्ला केला. गद्दार म्हणून हिणवले जात असले तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोक मोठ्या प्रमाणावर आपल्यासोबतही असल्याचे दाखवून दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT