Mumbai : ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार हे स्पष्ट झाल्यानंतर शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी शिंदे गटाने माघार का घेतली, याबाबत भाष्य केले आहे. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा कुठल्या मैदानावर घ्यावा, याबाबत जी भूमिका घेतली आहे, त्याच ठिकाणी सभा होईल. या मुद्द्यांवरून शिवसैनिकांनी एकमेकांना दगड मारणे अपेक्षित नाही. काही नेते आपल्यामध्ये भांडणे लावण्याचे काम करीत आहेत," असे शिरसाट म्हणाले.
"नांदेड येथील सरकारी रुग्णालय मृत्यू प्रकरणावर शिरसाट म्हणाले, "सरकारी रुग्णालयातील सर्व मृत्यू हे डाॅक्टरांच्या चुकीने होतात, असे नाही. पण राजकीय नेत्यांनी सरकारी डाॅक्टरांना त्रास देऊ नये," असे शिरसाट म्हणाले.
"विरोधी पक्षाच्या नेत्यांनी डॉक्टरांवर दबाव टाकू नये, आमच्या खासदाराने रुग्णालयाच्या डीनला टॉयलेट साफ करायला लावले त्यांचे मी समर्थन करीत नाही, जो गुन्हेगार असेल त्यावर कारवाई व्हायला हवी," असे शिरसाट यांनी सांगितले.
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळण्यासाठी केलेला अर्ज शिंदे गटाने मागे घेतला आहे. त्यामुळे शिवाजी पार्क मैदान हे आता ठाकरे गटाला मिळणार हे स्पष्ट झाले आहे. शिंदे गटाचा मेळावा दुसऱ्या मैदानावर हौणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
ठाकरे आणि शिंदे गटाने (Eknath Shinde) शिवाजी पार्क मिळावे म्हणून मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल केले होते. शिवाजी पार्क मैदान आपल्यालाच मिळणार, असा दावा दोन्ही गटांकडून करण्यात येत होता. त्यामुळे शिवाजी पार्कवर यंदा कोणाचा दसरा मेळावा पार पडणार, असा प्रश्न अनेकांना पडला होता. हा वाद पुन्हा न्यायालयात जाणार का, अशी चर्चा होती, पण शिंदे गटाने आपला अर्ज मागे घेतल्याने आता शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचाच आवाज घुमणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.