Assembly Monsoon Session: Sarkarnama
मुंबई

Assembly Monsoon Session: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली; तीन आठवडे चालणार अधिवेशन

Political News: 17 जुलै ते 4 ऑगस्ट 2023 पर्यंत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाच चालणार आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News: राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 17 जुलैपासून सुरू होणार असून 15 दिवस या अधिवेशनाचे कामकाज चालणार आहे. 17 जुलै ते 4 ऑगस्ट 2023 पर्यंत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाच चालणार आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाच ठरवण्यासंदर्भात सल्लागार समितीची आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या.

दरम्यान, राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत मुंबईत पार पडणार आहे. या 19 दिवसांच्या कालावधीत अधिवेशनाचं प्रत्यक्ष कामकाज 15 दिवस चालणार आहे. तर चार दिवस सुट्ट्यांचे असणार आहेत.

राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाबाबत आज विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी माहिती दिली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा गट भाजपसोबत सत्तेत सामिल झाला. तसेच अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व घाडामोडी पाहता आता अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT