Ashok Chavan on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून नांदेडमध्ये उपोषणाला बसलेल्या दत्ता पाटील या तरुणाच्या मुद्द्यांकडे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सभागृहात सरकारचे लक्ष वेधले. दत्ता पाटील याची समजूत काढून त्याला उपोषण सोडण्यास मदत करावी, असा आग्रहही चव्हाणांनी धरला.
अशोक चव्हाण म्हणाले, "नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यातील दत्ता पाटील हडसणकर हा तरुण मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तो अॅडमिट असून त्याची प्रकृती गंभीर आहे. माझी सरकारला विनंती आहे की, सरकारची मराठा आरक्षणासंदर्भातील जी काही सद्य स्थिती आहे. या संदर्भात आपण पुढे काय करणार आहात, हा विषय अजून संपलेला नाही. (Monsoon Session 2023 Update)
रिव्ह्यू पिटीशन दाखल करण्यासंदर्भात घेण्याचा निर्णय, ५०टक्के आरक्षणाची मर्यादा घालण्यात आली आहे, या सर्व गोष्टी इंदिरा सहानी प्रकरणामुळे अडलेल्या आहेत.या संदर्भात ज्या काही गोष्टी अडकून पडल्या आहेत, पण या तरुणाची प्रकृती गेल्या १०-१५ दिवसांपासून गंभीर आहे. सरकारच्या माध्यामातून मला काही आश्वासन दिल्यास आपण उपोषण सोडू, असं त्याचं म्हणणं आहे. आपला प्रतिनिधी तिकडे पाठवावा आणि त्याला आश्वासित करावं. अशी माझी विनंती आहे. या कडे माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी लक्ष वेधलं आहे. (Monsoon Session 2023)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिलं आहे. "या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली जाईल. या संदर्भातील भूमिकाही स्वतंत्रपणे सभागृहात मांडू. पण सध्या त्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. शासनाकडून त्याला विनंती केली जाईल आणि त्याचं उपोषण सुटेल,याचीही काळजी घेतली जाईल, असं आश्वासन फडणवीसांनी यावेळी दिलं.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.