balasaheb thackeray,chhagan bhujbal sarkarnama
मुंबई

भुजबळ म्हणाले, ''मला बाळासाहेबांना त्रास द्यायचा नव्हता, पण..

बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) हे कुटुंबप्रमुख होते. त्यांनी मी कधी चिडलेले पाहिले नाही,'' अशा अनेक आठवणींना छगन भुजबळ यांनी (chhagan bhujbal) उजाळा दिला.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ''शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मराठी माणसांच्या नोकऱ्यांसाठी पुढे आले. शिवाजी पार्कच्या पहिल्याच भाषणात मी शिवसैनिक झालो, शाखाप्रमुख झालो. बाळासाहेब आणि माँसाहेबांना मी आई-वडील मानायचो, शिवसेना एक कुंटुब आहे. बाळासाहेब (balasaheb thackeray) हे कुटुंबप्रमुख होते. त्यांनी मी कधी चिडलेले पाहिले नाही,'' अशा अनेक आठवणींना अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी (chhagan bhujbal) उजाळा दिला. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भुजबळ बोलत होते.

''शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तुरुंगात न्यायचे नाही, हे आमचे ठरलं होतं. त्यांनी जामीन मागितला तर जामीनाला विरोध करायचा नाही, असा निर्णय झाला होता.पण न्यायालयाने जामीन नाकारला , तर मातोश्री जेल म्हणून जाहीर करायचे, हे आम्ही ठरवलं होते. गृहमंत्री असल्याने मला तसे अधिकार होते, एखाद्या वास्तूला जेल म्हणून मी जाहीर करु शकत होतो,'' असा गैाप्यस्फोट भुजबळ यांनी मुलाखतीत केला.

भुजबळ म्हणाले की राष्ट्रवादी कॉग्रेसची सत्ता स्थापन झाल्यावर श्रीकृष्ण आयोगाची अंमलबजावणी करु, असे आम्ही शिवाजी पार्कवर जाहीर केलं होते. १९९३च्या दंगलीनंतर हा आयोग नेमण्यात आला होता. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी हा अहवाल फेटाळला. मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे सत्तेत होते, तेव्हा शिवसेनेविरोधातील अनेक फाइल्स बंद केल्या होत्या. मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होतो, तेव्हा माझ्यासमोर ती फाइल आली. तेव्हा श्रीकृष्ण आयोगातील अनेक प्रकरणे आली होती.

भुजबळ म्हणाले, ''मी ज्या पदावर होतो तेव्हा मला ही कारवाई करावी लागली. कारण श्रीकृष्ण आयोग आम्ही स्वीकारु असे आम्ही जाहीर केले होते. त्यावेळी खासदार संजय राऊत माझ्याकडे आले. आमचे बोलणे झाले. मलाही बाळासाहेबांना त्रास द्यायचा नव्हता, पण निर्णय घेतला नसता तर अडचणीचे झाले असते म्हणून मातोश्रीलाच तुरुंग जाहीर करण्याची तयारीही केली होती. पण ती वेळ आली नाही. अटकेच्या घटनेनंतर बाळासाहेबांनी मला सहकुटुंब मातोश्रीवर जेवायला बोलावले. जेवणातील टेबलावर आमच्यातील वाद क्षणात नष्ट झाले.''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT