Aditya Thackeray Night life project may be delayed Hints Home minister Anil Deshmukh
Aditya Thackeray Night life project may be delayed Hints Home minister Anil Deshmukh 
मुंबई

'नाईट लाईफ' योजनेच्या चाचणीला गृहमंत्र्यांचा खो?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा नाईट लाईफचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तसे संकेत दिले आहेत. नाईट लाईफबाबत विस्तृत प्रस्तावावर 22 जानेवारी रोजी कॅबिनेटमध्ये पहिल्यांदा चर्चा होईल, व त्यानंतरच नाईट लाईफ संदर्भात योग्य निर्णय होऊ शकेल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी नाईट लाईफबाबतचा निर्णय घेतल्यानंतर 26 जानेवारी पासून या निर्णयाची प्रायोगिक तत्वावर अंमलबाजवणी सुरू होणार होती. मात्र, अनिल देशमुखांच्या वक्तव्यामुळे 26 जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या पोलिसांवर मोठा ताण आहे. पोलीस 12 ते 14 तास रोज काम करत आहेत. इतक्‍या कमी वेळेत नाईट लाईफ सुरू करण्यासाठी लागणारी यंत्रणा अजून तयार नाही. नाईट लाईफच्या निर्णयानंतर त्यासाठी अतिरिक्त पोलीस आहेत का, याची माहिती घ्यावी लागेल. त्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. 

26 जानेवारीपर्यंत याबाबत अंतिम निर्णय होईल, असे वाटत नसल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. मुंबईत 26 जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफ सुरु करण्याचा निर्णय आदित्य ठाकरेंनी घेतला आहे. त्यानुसार मुंबईत अनिवासी भागातील सर्व थिएटर, मॉल्स, रेस्टॉरंटस्‌ 24 तास खुले ठेवण्यास परवानगी दिली जाणार आहे. नरिमन पॉईंट, काला घोडा, बीकेसी, कमला मिल अशा मुंबईतील अनिवासी भागात नाईट लाईफ सुरु होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT