Deepak Kesarkar-Sharad Pawar-Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याला संजय राऊतच जबाबदार

Deepak Kesarkar : आमदार दिपक केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Deepak Kesarkar : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज राजीनामा दिला ही आमच्यासाठी आनंदाजी गोष्ट नसून दु:खाची गोष्ट आहे आणि याला कॅाग्रेस आणि राष्ट्रवादी कॅाग्रेस व तितकेच जबाबदार संजय राऊत (Sanjay Raut) आहेत, अश्या शब्दात बंडखोर शिंदे गटाचे आमदार दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राऊतांवर टीका केली आहे.

केसरकर यांंनी ठाकरेंनी राजीनाम्याला महाविकास आघाडीतील मित्रपक्षांबरोबरच संजय राऊतांनाही जबाबदार धरले आहे. ते म्हणाले की,राष्ट्रवादी कॅाग्रेसकडून सातत्याने शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावे लागले. ठाकरेंनी आमच्या तक्रारी न ऐकता त्यांनी पवारांचं ऐकलं ते आमचा पक्ष कश्याला वाढवतील, असा सवाल करत त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राष्ट्रवादी कॅाग्रेसवर जोरदार टीका केली.

आम्ही ठाकरे यांना सांगत होतो मात्र, त्यांनी आमचं ऐकलं नाही. त्यात संजय राऊतांमुळे आमची ठाकरेंसोबत दरी वाढत गेली. त्यामुळे हा परिणाम झाला. आम्ही कुणीही त्यांचा राजीनामा मागितला नाही मात्र, पवारांनी कायद्याची लढाई सुरू केली. आणि आमच्यावर कारवाई करण्याची लढाई सुरू केली. कोण जवळचे पवार की शिवसैनिक हा विचार उद्धव साहेबांनी करावा. आमचा लढा शिवसेनेच्या आस्तित्वासाठी आहे. संभाजीनगर या नामांतरासाठीही आम्ही बोलल्यावर हे झालं, असा टोलाही त्यांनी लगावला.

आता आम्ही सत्तास्थापनेसाठी उद्या बैठक घेणार असून मंत्रीमंडळाबद्दल आमच्या आमदारांमध्ये चर्चा होणार आहे. आमचे विधिमंडळ नेते शिंदे साहेबच आहेत. मात्र, आमचे लोक राऊतांवर चिडून आहेत. त्यांनी भाजप आणि शिवसेनेमध्ये दरी निर्माण केली. आम्ही उद्धव ठाकरेंपासून दुर गेलेलो नाही मात्र, त्यांनी शेवटर्यंत मविआ सोडली नाही, असे केसरकर म्हणाले.

आता उद्धव ठाकरेंसोबत येणार का या प्रश्नावर केसरकर म्हणाले की, आता मुदत संपली असून दुसऱ्या पक्षासोबत बोलणी झाली आहे. आता माघार घेता येणार नाही. यापुढेही संजय राऊत मध्यस्थी असतील तर दरी मिटणार नाही. त्यांनी उद्धव साहेबांची भाषा बोलली पाहिजे ते तोडण्याची भाषा करतात. ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे आम्हाला दुख: झाल आहे. आम्ही शिवसेना वाचवायचे कर्तव्य पार पाडले. उर्वरीत 16 आमदार आमचेच आहेत. मात्र, संजय राऊतांनी राजीनामा द्यायला पाहीजे त्यांनी राष्ट्रवादीचे स्वप्न पूर्ण केले आहे, अशी टीका केसरकरांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT