Deepak Kesarkar
Deepak Kesarkar sarkarnama
मुंबई

दीपक केसरकरांच्या अश्रूंचा फुटला बांध : मुख्यमंत्री शिंदेंविषयी सांगताना आला हुंदका

सरकारनामा ब्युरो

मुंबई - राज्यात शिवसेना बंडखोर व भाजपला बरोबर घेत एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी सरकार स्थापन केले आहे. या सरकारचे प्रवक्ते असलेल्या बंडखोर आमदार दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विषयी बोलताना अश्रू अनावर झाले. एकनाथ शिंदे यांना सहकार्यांनी केलेल्या मदतीची जाणिव आहे. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने राज्याला न्याय देतील असे सांगतानाच केसरकरांनी एक किस्सा ऐकविला. हा किस्सा ऐकविताना केसरकर भावूक झाले. राज्याचे माजी गृहराज्य मंत्री राहिलेल्या केसरकरांच्या डोळ्यात तरळलेले अश्रू हे राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. ( Deepak Kesarkar's tears burst )

दीपक केसरकर म्हणाले, आमचे नेते एकनाथ शिंदे असे आहेत की, मी ज्या दिवशी त्यांना सांगितले, 'मी माझ्या मतदार संघात जातो. मात्र मी 15 तारखेला परत येणार आहे.' त्यावेळी ते म्हणाले, 'आवश्यकता असेल तर मी तुमच्या बरोबर येईल.' एवढ्या मोठ्या मनाचा मनुष्य मी आज तागायत पाहिलेला नाही, असे सांगत ते भावूक झाले.

ते पुढे म्हणाले की, सर्व सामान्य तळागाळातील असा नेता जो त्याला असे वाटते की, ज्यांनी आपले प्रतिनिधीत्व केले. आपली बाजू मांडली. त्याच्या बरोबर आपणही त्याच्या मतदार संघात गेले पाहिजे. अशी भावना कुठले मुख्यमंत्री ठेवत असतील तर ते महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकते, असे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला.

भावूक झालेल्या केसरकरांना पुढे शब्दही फुटत नव्हते. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना थोपविण्याचा प्रयत्न करत ते पत्रकारांपासून दूर गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT