Mahesh Tapase| NCP
Mahesh Tapase| NCP Sarkarnama
मुंबई

सोमय्यांकडून जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न; महेश तपासेंचा आरोप

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा वैद्यकीय अहवाल स्वत: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. याच वेळी त्यांनी राणा दांपत्य, मुंबई पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झालेल्या त्या दिवशीच्या घडामोंडींवरही भाष्य केलं आहे.

दरम्यान भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सोमय्यांवर हल्ला झाल्यानंतर त्यांची भाभा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. या तपासणीचा अहवाल आता रुग्णालयाकडून मिळाला आहे. सोमय्यांना किरकोळ जखम झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. मात्र, या जखमेतून रक्तस्राव झाला नसल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. याचबरोबर सोमय्यांना कोणताही गंभीर दुखापत झाली नसल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या वैद्यकीय अहवालाच्या मुद्द्यावरुन महेश तपासे यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. एकीकडे राणा दांपत्य दूसरीकडे त्यांना संरक्षण देणारे मुंबई पोलीस आणि तिसरीकडे किरीट सोमय्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जात जाणूनबुजुन तेथील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तपासे यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर किरीट सोमय्या यांनी आपल्या जखमेचे चांगले व्हिज्युअल्स तयार करण्याचा प्रयत्न केला, अशी खोचक टीकाही महेश तपासे यांनी केली. तसेच त्यांनी काहीही केलं तरी महाराष्ट्रातील सरकार अस्थिर होणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांनी त्यांना जातीवरुन दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप केला. पण मुंबई पोलीस आयुक्तांनी एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्या आरोपांची पोलखोल केली. राणांनी त्यांच्याशी केलेल्या वागणूकीबाबत लोकसभा अध्यक्षांना माहिती दिली, मग उच्च न्यायालयात का नाही दिली, त्यांनी पोलिसांत जी तक्रार दिली त्यात याचा उल्लेख का नाही केला, असा सवालही तपासे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, या सर्व घडामोडींमधून राज्यात जातीय तेढ निर्माण करायचा, सरकार अस्थिर करायचं हे षडयंत्र सुरु असल्याचा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT