devendra fadanavis on Vedanta Foxconn Sarkarnama
मुंबई

Vedanta Foxconn : ठाकरे सरकारच्या काळात निसटलेले उद्योग पुन्हा येणार ; फडणवीस म्हणाले, 'फॉक्सकॉन' ला महाराष्ट्रात..

Maharashtra News : अनेक प्रकल्प परराज्यात गेली, असा आरोप तेव्हा विरोधकांनी केला होता.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : महाविकास आघाडीच्या काळात अनेक उद्योग, प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून गेल्यानंतर विरोधकांनी रान उठवले होते. त्यानंतर आता "फॉक्सकॉन'ला महाराष्ट्रात यावेच लागेल," असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे आघाडीच्या काळात महाराष्ट्रातून निसटलेले उद्योग पुन्हा येणार, याबाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

महाविकास आघाडीच्या काळात अनेक उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले, असे सांगत फडणवीसांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

"तत्कालीन राज्य सरकारच्या धोरण लकव्यामुळे फॉक्सकॉन कंपनी राज्यात आली नाही, उद्योगाच्या बाबतीत महाराष्ट्र हे चुंबक आहे, त्यामुळे फॉक्सकॉनला महाराष्ट्रात यावेच लागेल, असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले. ते एका मुलाखतीत बोलत होते. (Latest Marathi News)

महाराष्ट्रात येऊ घातलेले प्रकल्प किंवा महाराष्ट्र स्पर्धेत असूनही राज्यात गुंतवणूक होत नाही, असा आरोप ठाकरे सरकाच्या काळात विरोधकांनी केला होता. त्यामुळे राज्यातलं राजकारणही तापले होते. उद्योग महाराष्ट्राबाहेर गेल्याने राज्यभर विरोधकांनी आंदोलने केली होती. वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस सी-२९५, सॅफ्रन प्रकल्प, बल्क ड्रम प्रोजेक्ट, मेडिकल दिव्हन पार्क, असे अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून परराज्यात गेली, असा आरोप तेव्हा विरोधकांनी केला होता.

खनिकर्म क्षेत्रातील बडी कंपनी असलेली वेदांत आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती करणारी तैवानची बडी कंपनी 'फॉक्सकॉन' यांनी सेमीकंडक्टर उत्पादित करण्यासाठी प्रकल्प सुरू करायचे ठरवले होते. हा प्रकल्प गुजरातला गेला. वेदांता फॉक्सकॉन या कंपनीची गुंतवणूक तब्बल १ लाख ६६ हजार कोटींची होती.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT