Devendra Fadnavis Latest News, Raj Thackeray Latest Marathi News
Devendra Fadnavis Latest News, Raj Thackeray Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : राज ठाकरे अन् फडणवीसांची 'शिवतीर्था'वर तासभर खलबतं

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले आहे. हे सरकार स्थापन करण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही हातभार आहे. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. 'शिवतीर्थ' या ठाकरेंच्या निवासस्थानी दोघांमध्ये सुमारे तासभर खलबतं झाली. (Raj Thackeray Latest News)

दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा भाजप (BJP) व मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच हे दोन नेते भेटले. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु प्रत्यक्ष राज ठाकरे यांनीच हे वृत्त खोटे असल्याचे सांगितल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना एक पत्र लिहून त्यांचे कौतुक केले होते. त्याचा उल्लेख फडणवीस यांनी विधानसभेतही केला होता. आपण राज ठाकरे यांना भेटणार असल्याचे फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर शुक्रवारी दोन्ही नेत्यांची भेट झाली. राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी फडणवीसांचे औक्षण केले. तर राज यांनी भगवे उपरणे आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याने विचारपूस करण्यासाठी भेट घेणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले होते. या भेटीनंतर त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'मनसे नेते राज ठाकरे यांची आज मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.'

दरम्यान, या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहे. आगामी महापालिका, नगरपालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र येणार का, शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर मनसेला जवळ करून भाजप उद्धव ठाकरेंना आव्हान देणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित केला जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT