Anil Deshmukh News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे तब्बल १३ महिन्यानंतर जेलबाहेर आले. यावेळी जेलबाहेर त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. अनिल देशमुख हे बाहेर येताच आपल्या कुटुंबीयांना भेटले. यावेळी अनिल देशमुख यांची पत्नी आरती देशमुख या भावूक होत त्यांना रडू कोसळले. १३ महिन्यानंतर अनिल देशमुख हे आपल्या कुटुंबीयांना भेटले. त्यामुळे देशमुख कुटुंबीय हे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
तसेच अनिल देशमुख हे जेलबाहेर आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे देखील उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली. अनिल देशमुख हे जेलबाहेर येताच त्यांनी आपल्याला खोट्या गुन्ह्यात तुरुंगात राहावे लागले याचे दुःख असल्याची खंत माध्यमांशी बोलताना त्यांनी व्यक्त केली.
देशमुख म्हणाले, ''मला खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आलं. परमबीर सिंह यांनी माझ्यावर १०० कोटींच्या वसुलीचे खोटे आरोप केले. त्यांनी चांदीवाल आयोगाकडे प्रतीज्ञापत्र सादर करताना म्हटलं, मी अनिल देशमुखांवर जे आरोप केले, ते ऐकीव माहितीवर होते, माझ्याकडे याबाबत पुरावे नाहीत'', असं ते म्हणाले.
''पण माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता अखेर मला न्याय व्यवस्थेने न्याय दिला. मात्र खोट्या गुन्ह्यात मला तुरुंगात राहावे लागले याचे दुःख आहे. पण या सर्व प्रकरणादरम्यान राष्ट्रवादी माझ्या पाठिशी खंबीर उभा राहिली. त्यामुळे त्या सर्वांचे आभार'', अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.