Devendra Fadanvis
Devendra Fadanvis  Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis News: फडणवीस म्हणाले, 'योग्य वेळी ब्रेकींग न्युज देणार...'

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Politics: आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता. माझ्यावर केसेस टाकण्याचा, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा, मला तुरुंगात टाकण्याचे पोलिसांना टार्गेट देण्यात आले होते. असा दावा काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या दाव्याबाबत त्यांनी पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला मी योग्य वेळ आली की ब्रेकिंग न्युज देईल, असं सूचक वक्तव्य केलं आहे.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी भाष्य केलं आहे. काहीही करुन देवेंद्र फडणवीसांना अटक कऱण्याचे सर्वोच्च पातळीवरुन जबाबदारी देण्यात आली होती. यातील सर्वोच्च पातळी कोणती, असा सवाल विचारला असता फडणवीस म्हणाले की, पोलिस आयुक्ताची तर ही हिंमत होऊ शकत नाही आणि वरुन आदेश आल्याशिवाय हे होऊ शकत नाही. महाविकास आघाडीचे एक गृहमंत्री त्यावेळी जेलमध्ये होते, दुसरे गृहमंत्री असं करतील असं मला वाटत नाही. पण ज्या कोणी सर्वोच्च व्यक्तीने मला जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिले होते. पण ते पक्षाच्या नेत्यांकडून होते की मुख्यमंत्र्यांकडून होते, हे समोर येईलच.

पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याची कल्पना होती. ते त्यांचे आदेश होते की त्यांची मूक त्यांची संमती होती एवढचं मला बघायचयं. तर एका माणसाचा हा निर्णय असू शकत नाही, बरेच लोक त्यामागे काम करत होते. त्यामुळे हे जे बरेच लोक आहेत. सगळं काही पहिल्या मुलाखतीत सांगणार नाही. ब्रेकिंग न्यूज एकदम देत नसतो मी. त्यामुळे योग्यवेळी बाकी न्यूज देईल. एवढी घाई करू नका.’ असं सूचक वक्तव्य एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

महाविकास आघाडी मला जेलमध्ये टाकू सुद्धा शकली नसती. तेवढी त्यांची ताकदही नाही, हिंमतही नाही, तेवढी क्षमताही नाही. मला जेलमध्ये टाकू शकले नसले. मला जेलमध्ये टाकावं असं मी काही केलं नाही, पण त्यांनी जंग जंग पछाडलं, खोटी कागदपत्रे तयार करण्याचा प्रयत्न केला.मला जेलमध्ये टाकण्यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना सुपारी देण्यात आली होती.''

पण ‘शेवटी मी सुद्धा पाच वर्षे गृहमंत्री होतो. गृह खात्यामध्ये माझेही संबंध आहेत. मी कधीही कुणाची पैसे घेऊन पोस्टींग केलं नाही. मिरीटवर लोकांना पोस्ट दिल्या. ज्यांना कधीही आपेक्षाही नव्हत्या की त्यांना अशी पोस्ट मिळू शकतात. कधी कोणाला अपमानित केलं नाही. त्यामुळे पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये माझ्याबद्दल प्रेम होतं. त्यामुळे ते जे प्रयत्न करायचे ते मला कळायचे. किंबहुना ते जे प्रयत्न करायचे. किंबहुना त्यामध्ये कोणीही त्यांना मदतही करत नव्हतं. अधिकाऱ्यांनाही माहीत होतं की, हे वागणं चांगलं नाही. तर महाराष्ट्रातील ब्युराक्रसी इतर राज्यांच्या तुलनेत चांगली आहे. पोलीसही चांगले आहेत. त्यामुळे ते मला तुरुंगात टाकू शकले नाहीत.’

त्यांनी मला केसेस करण्याचा प्रयत्न केला, खोटी कागदपत्रे तयार करण्याचा प्रयत्न केला, खोटे जबाब घेतले. ज्या पोलिस अधिकाऱ्यांना काही प्रॉब्लेम होते, तेव्हा त्यांना सांगितलं की, आम्हाला तेव्हाच्या गृहमंत्र्यांनीच तसे आदेश दिले होते. अशा प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांवरही दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण कोणताही पोलीस त्यांच्या दबावाला बळी पडला नाही. त्यानंतर त्यांनी खोटी कागदपत्रे तयार करण्याचा प्रयत्न केला गेला. पण खोटी कागदपत्रे तयार करायची तरी त्यासाठी मागे-पुढे काही लिंक लागतात, ते त्यांना करता आलं नाही, त्यामुळे ते काही करु शकले नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT