Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Devendra Fadanvis : संजय राऊतांनी मागणी केली तर भेट देणार ; कटुता एक पक्ष संपवू शकत नाही!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कटुता संपवूया, या भूमिकेचं स्वागत करतो, लवकरच फडणवीसांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. यावर आता फडणवीस यांनी राऊत यांच्या विधानाबाबतीत प्रतिक्रीया दिली आहे. संजय राऊत यांनी भेट मागितली तर भेट देणार, असे फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "संजय राऊत यांनी भेट मागितली तर नक्की भेट देणार. राजकारणतील कटुता दूर करायची असेल तर, सगळ्यांना मिळून ठरवावं लागेल. कोणताही एक पक्ष हे दूर करू शकत नाही. मुख्य नेत्यांनी शांत राहायचं आणि इतरांना बोलायला लावायचं, ही पद्धत बंद झाली पाहिजे."

दरम्यान राऊत म्हणाले की, राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालवतात. मी आतमध्ये असताना फडणवीस म्हणाले की, कटुता संपवली पाहिजे. या त्यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. ते राज्याचे कारभारी असल्याने मी लवकरत त्यांची भेट घेणार आहे. माझ्या बाबतीत जे काही घडलं त्याबद्दल सांगण्यासाठी मी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संजय राऊत पुढे म्हणाले, "तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच हाताला घड्याळ बांधले आहे. जेलमधून सुटल्यानंतर लोक मला विसरुन जातील, असे वाटलं होते. पण कालपासून जनता माझे स्वागत करीत आहेत. जे भोगायचे होते ते मी भोगलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT