Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : अविकसित मुंबईचे खापर; फडणवीस यांनी फोडले उध्दव ठाकरेंवर !

Maharashtra Politics : एका मुलाखतीत उध्दव ठाकरेंच्या निष्क्रियतेवर फडणवीसांनी जोरदार टिका केली. इतक्यावर फडणवीस थांबले नाही त्यांनी काँग्रेसच्या घराणेशाहीचा पॅटर्न राज्यातील काही पक्षात उतरल्याचे सांगितले. त्यामुळेच त्यांची वाताहात झाल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.

Sachin Deshpande

Loksabha Election 2024 : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हातून सत्ता निसटल्यानंतर त्यांनी विशेषतः भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार आरोप करणे सुरु केले आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आरोपांचा धुराळा उडाला असताना भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उध्दव ठाकरेंच्या निष्क्रियतेवर बोट ठेवत चांगलेच घेरले आहे. शिवसेनेची मुंबईत गेली पंचवीस वर्षे सत्ता आहे. त्यात अनेक वर्षे हे उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात सत्ता राबविली गेली. असे असताना मुंबईचा दाखविण्याजोगा विकास केवळ महायुती आणि भाजप सरकारने केल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते वरळीत आयोजित 'काँग्रेस ना होती तो क्या होता' या विषयावर बोलत होते. या मुलाखतीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी विविध गौप्यस्फोट करत महाराष्ट्रातील गढुळ राजकारणास कोण जबाबदार होते यांची माहिती दिली.

मुंबईत पंचवीस वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेनेने आणि विशेषतः उध्दव ठाकरे यांच्या ताब्यात मुंबई असताना त्यात कुठलाच मोठा बदल झाला नाही. ठाकरे यांच्या सत्ताकाळात मुंबईत दाखविण्यायोग्य आणि मुंबईला ओळख देणारे कुठेच मोठे काम झाले नसल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. फडणवीसांनी ठाकरेंच्या निष्क्रियेतवर बोट ठेवत आज विविध आरोप केले. मुंबईतील असे ऐखादे काम दाखवा जे ठाकरे यांच्या कार्यकाळात झाले. असे म्हणत अविकसित मुंबईचे खापर फडणवीस यांनी ठाकरेंवर फोडले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस ना होती तो क्या होता या मुळ विषयावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस काळात देशातील असुरक्षित परिस्थिती, वारंवार अमेरिकेसमोर ची दयायाचना, युनो समोर हात परसविणारा देश अशी देशाची ओळख होती. काँग्रेसमुळे देशात दहशतवाद वाढला, मुळात काँग्रेसमुळे देशाचे विभाजन झाल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. देशातील भ्रष्टाचार आणि दहशतवाद याला काँग्रेस जबाबदार होती आणि आहे असा आरोप फडणवीस यांनी आज एका मुलाखतीत केला.भारत अविकसित ठेवण्यात काँग्रेसचा मोठा हातभार होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाचा विकासाचा मार्ग सुकर झाल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. जम्मु काश्मीर बाबत 370 ची चुक काँग्रेसने करुन ठेवल्याचा आरोप फडणवीस यांनी लगावाला. काँग्रेस नसती तर आता पर्यंत भारत विकसित आणि सशक्त झाला असता असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

महाराष्ट्रात पैशातून सत्ता आणि सत्तेतून पुन्हा पैसा या चक्रातून गुंडगिरी राजकारणात वाढली. महाराष्ट्र निर्मितीपासून राज्याच्या तीस ते चाळीस वर्षाचे राजकारण हे केवळ 30 ते 50 परिवारांच्या अवती भवती फिरत होते. भाजपमुळे इतरांना या राजकीय व्यवस्थेत जिंवत राहता आले. महाराष्ट्र निर्मिती नंतर पहिल्या तीस - चाळीस वर्ष महाराष्ट्राचे राजकारण 50 परिवारांच्या मधात सत्ता केंद्रित होते. काहींनी केवळ त्यांच्या परिवारासाठी राजकारण केले. पंतप्रधान मोदी यांच्या आगमनानंतर महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाचे चित्र 2014 नंतर बदलले. क्षेत्रीय राजकारणातील दिग्गजांना बाजुला केले गेले. मोदींच्या स्ट्राँग लीडरशीपमुळे ते शक्य झाल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. गुंडाशिवाय देशात आणि राज्यात राजकारण होऊ शकते हे भाजप ने दाखविले. राजकारणाची स्वच्छता मोहिम भविष्यात देखील सुरु राहील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

काँग्रेस च्या घराणेशाही माॅडेलवर इतर राजकीय पक्ष उदयास आले. त्यांनी देखील घराणेशाहीचे माॅडेल त्यांच्या त्यांच्या पक्षात स्थापन केले मोठे केले. पण, भाजप मात्र एकमात्र पक्ष आहे जिथे विचारधारेला प्रमुख स्थान देण्यात आले. घराणेशाहीचा अर्थ असा आहे की राजकीय नेत्यांच्या मुलामुलींनी राजकारणामध्ये यावे त्यांनी स्वतःच्या सक्षतेवर राजकारण करावे,असा सल्ला फडणवीस यांनी दिला. काँग्रेस मध्ये पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आहेत. पण, निर्णय घेताना सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना विचारुनच निर्णय घ्यावा लागतो. अशाच प्रकारची घराणेशाही ही राष्ट्रवादी काँग्रेस च्या सुप्रिया सुळे आणि शिवसनेचे आदित्य ठाकरे यांच्या परिवारात देखील असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. विचारधारेला सोडून राजकारण केल्याने त्यांच्यात फुट पडली आहे.असे फडणवीस या मुलाखतीत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT