मुंबई : काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची गुरुवारी (ता. १ सप्टेंबर) भाजप (BJP) पदाधिकाऱ्याच्या घरी भेट झाली आहे. या दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या भेटीवर काँग्रेस आणि भाजप नेत्यांनी मात्र मौन पाळले आहे. (Devendra Fadnavis-Ashok Chavan meeting in Mumbai)
भाजप आणि शिंदे गटात समन्वयासाठी नियुक्त करण्यात आलेले भाजपचे पदाधिकारी आशिष कुलकर्णी यांच्या घरी गुरुवारी (ता. १ सप्टेंबर) अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. फडणवीस हे कुलकर्णी यांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी गेले हेाते. नेमके त्याचवेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्या ठिकाणी गेले हेाते. त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे ही चर्चा राजकीय असल्याचे सांगण्यात येत आहे.
फडणवीस आणि चव्हाण यांच्यातील भेट हा योगायोग होता की ठरवून केलेली गोष्ट आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेस पक्षात धूसफूस असल्याचे दिसून येत होते. त्या निवडणुकीत काँग्रेसची तब्बल सातहून अधिक मते फुटल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच म्हटले होते. त्यामुळे काँग्रेसमधील एक गट फुटणार असल्याची चर्चा विधान परिषदेच्या निवडणुकीपासूनच राज्यात सुरू आहे.
दरम्यान, काँग्रेसमधील एक गट फुटणार असून दोन माजी मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे सरकारचा आगामी विस्तार आक्टोबर महिन्यांत होणार असून त्यावेळी काँग्रेसमधील दोन बड्या नेत्यांचा त्यावेळी शपथविधी होणार असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळीही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह तब्बल १० आमदार उशिराने पोचले होते. उशिर झाल्यामुळे त्यांना मतदान करता आले नव्हते. त्याची चर्चाही पक्षात झाली होती, त्याचा जाब काँग्रेस हायकमांडने राज्यातील नेत्यांना विचारला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.