Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis News : ऐन लोकसभेत फडणवीसांचं खळबळजनक विधान; '...तर मी राजकारणातून निवृत्ती घेतली असती!'

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : राज्यात लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. या काळात महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी एकमेकांवर सडकून टीक केली. आता निवडणुकीचा राज्यातील शेवटचा पाचवा टप्पा बाकी आहे. त्यासाठी दोन्ही गटातील नेत्यांनी प्रचाराची अक्षरशः राळ उठवली आहे.

महायुतीच्या केंद्रीय मंत्रांसह राज्यातील नेत्यांनी आघीडीतील उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना Sharad Pawar लक्ष्य केले. ठाकरेंनी बदलेल्या भूमिकेचा समाचार घेतना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तशी वेळ आपल्यावर आली असती तर राजकारण सोडले असते, अशी टीका केली.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ठाकरेंनी बदललेल्या भूमिकेवरून जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस म्हणाले, आयुष्यभर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी Balasaheb Thackeray आपल्या भाषणाची सुरुवात नेहमी माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि मातांनो अशीच केली आहे. त्यानंतर राजकारणात आलेल्या उद्धव ठाकरेंही त्याच शब्दांनी आपल्या भाषणाची सुरुवात करत होते.

अगदी ही निवडणूक सुरू होण्यापर्यंत ते माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो… असेच म्हणत होते. आता ते इंडिया आघाडीच्या सभांमधून मात्र हिंदू म्हणणे टाळत आहेत. आता ते माझ्या देशभक्त बांधवंनो म्हणत आहे. असे म्हणायला काही हरकत नाही, पण त्यांनी हिंदू का सोडलं?, असा थेट प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरेंच्या Uddhav Thackeray सभांसाठी मुस्लिमांची संख्या वाढताना दिसत आहे. यावरून फडणवीसांनी ठाकरेंवर हिंदुत्व सोडल्याची टीका केली. फडणवीस म्हणाले,ठाकरेंच्या सभांमध्ये आता पाकिस्तानचा झेंडा दिसत आहे. त्यांनी मात्र याचा एका शब्दानेही निषेध केलेला नाही. तसेच त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यांची बदललेली भूमिका अत्यंत वाईट आहे. तुम्ही कोणाचे सुपुत्र आहात, हे विसरलात का?, असा प्रश्नही त्यांनी थेट ठाकरेंना उद्देशून केला आहे. तसेच निवडणुका जिंकण्यासाठी आमच्यावर पाकिस्तानचा झेंडा हातात घेण्याची वेळ आली असती, तर राजकारणातून निवृत्ती घेतली असती, असे ठाणकावून सांगत फडणवीसांनी Devendra Fadnavis ठाकरेंचा समाचार घेतला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी जाहीर सभेतून काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून मुस्लिमांचे लांगूलचालनचा आरोप केला आहे. तर उद्धव ठाकरेंनी आमचे हिंदुत्व वेगळे असून ते घरातील चूल पेटवणारे असल्याचे वारंवार सांगितले आहे. यावर फडणवीसांनी निवडणुकांसाठी हिंदुत्व सोडणारे बाळासाहेबांच्या विचारांचे वारस होऊ शकत नाहीत. तर हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे खरे वारस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT