Devendra Fadanvis at Vidhansabha : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय चातुर्याची चर्चा राज्यभरात चर्चा असते. पण सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक फोटोही चांगलाच व्हायरल होत आहे. त्याचं कारणही तसंच आहे.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज (१७ जुलै) प्रारंभ झाला. शोकप्रस्ताव सादर झाल्यानंतर विधानसभा आणि विधान परिषद या दोन्हीचं कामकाज स्थगित करण्यात आलं. अशात देवेंद्र फडणवीस यांच्या कृती लक्ष वेधून घेतलं आहे.
फडणवीसांच्या या फोटोत नेमकं आहे काय?
त्याचं काय झालं, कामकाज सुरु होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस विधानसभेत दाखल झाले आणि थेट विधिमंडळाच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी निघाले. त्याचवेळी पाऊसही पडत होता. फडणवीसांनी सर्वात आधी पायातले बूट काढले आणि महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतही बूट न घालताच अनवाणी पायानेच फडणवीस थेट विभानभवनाच्या सभागृहाकडे निघाले. बूट भिजू नयेत आणि बुटांची घाण सभागृहात लागू नये म्हणून हातातच बूट घेऊन ते विधानभावनात पोहचले. त्यांचा हाच फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या चाहतेही त्यांच्या या साधेपणाचं कौतुक करत आहे.
भाजपच्या आमदारांकडूनही त्यांच्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी हाच फोटो ट्विट करत 'संघ संस्कारांचा स्वयंसेवक नेता' अशी कॅप्शन दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही बाब शिकण्यासारखी आहे, अशी प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनीही दिली आहे.
दरम्यान, विरोधकांनी ज्यावेळी थेट विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या पदावरच आक्षेप घेतला, तेव्हा फडणवीस यांनी पॉईंट ऑफर ऑर्डर उपस्थित करत विरोधकांना उत्तरही दिलं. तसेच, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केलेल्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरही फडणवीसांनी उत्तर दिलं.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.