Eknath Shinde Devandra Fadnavis
Eknath Shinde Devandra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis रात्रीस खेळ चाले : शिंदे-फडणवीसांची मध्यरात्री गुप्त बैठक!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांची काल रात्री सोमवार दि.१४ रोजी मध्यरात्री उशीरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी गुप्त बैठक पार पडली. ही बैठक संपवून मध्यरात्री बारा वाजून पन्नास मिनिटांनी ही बैठक संपवून वर्षावरून बाहेर पडताना दिसले. जवळपास दिड ते दोन तास चर्चा झाल्याची माहीती आहे. अनेक गोष्टींवर यावेळी खलबतं झाली आहे. मात्र यावेळी नेमक्या कोण - कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली, हे मात्र गुलदस्यात आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. तातडीने सुनावणी व्हावी अशी शिवसेना ठाकरे गटाची मागणी आहे, या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे राजकीय अर्थाने पाहिले जात आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका होणार आहेत, असे संकेत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दिले जात आहेत. शिंदे - फडणवीस सरकार पडणार, असा दावा विरोधी नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे.

यामुळे या गुप्त बैठकीत शिंदे आणि फडणवीसांमध्ये याबाबतीही रणनिती ठरवण्यात आल्याचे बोलले जात आहे. सत्तासंघर्ष, मध्यावधी, मुख्यमंत्र्यांचा आागामी गुवाहाटी दौरा याबाबतत सविस्तर खलबतं झाल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT