Uddhav Thackeray-Devendra Fadnavis Latest News sarkarnama
मुंबई

मुख्यमंत्री ठाकरे फडणवीसांना पुन्हा आडवे; ताफ्यामुळे फडणवीस ताटकळत

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज खासादार नवनीत राणा यांची लिलावती रूग्णालयात जाऊन भेट घेतली.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि विरोधी पक्ष भाजप (BJP) नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. दरम्यान, मशिदींवरील भोंग्याच्या मुद्दयावरून त्यात आणखीणच भर प़डली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या 'मातोश्री' या खासगी निवासस्थानी हनुमान चालिसा पठणावरून राणा दांपत्याला अटकही झाली. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. मात्र, यामुळे भाजप आणि सत्ताधारी पक्षांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, एका खासगी वृत्तवाहिनीने दाखवलेल्या एका बातमीत मुख्यमंत्री ठाकरे हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) पुन्हा आडवे आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा समोरून जात असल्याने फडणवीसांनी आपल्या गाडीतच ताटकळत रहावे लागेल्याचा प्रकार आज घडला आहे. (Devendra Fadnavis & Uddhav Thackeray Latest News)

मुख्यमंत्री ठाकरे यांनी 2019 साली भाजपची साथ सोडल्याने फडणवीसांना सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी राहण्याची संधी हूकली होती. आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंमुळे फडणवीसांना ताटकळत उभं रहावे लागले आहे.

झालं अस की, फडणवीस आज खासादार नवनीत राणा यांच्या तब्येतीची विचारपूस करून लिलावती रुग्णालयातून निघत असताना समोरून मुख्यमंत्री ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा जात होता. त्यामुळे फडणवीसांना आपल्या गाडीतच ताटखळत बसावं लागले. या बातमीचा व्हिडिओ एका खासगी वृत्तवाहिनीने दाखवला आहे. त्यामुळे गाडीच्या ताफ्याच्या निमित्ताने का होईना फडणवीसांना ताटकळत बसावे लागल्याचा प्रकार घडला आहे.

हा व्हिडिओ अनेकांना बघीतला असून सोशल माध्यमावर यावर चर्चाही रंगताना दिसत आहेत. मात्र, याबाबत अद्याप कुणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT