Sanjay Raut On Devendra Fadnavis sarkarnama
मुंबई

Sanjay Raut: फडणवीसांनी खाकी वर्दीतले अतिरेकी, नक्षलवादी पोसलेत! संजय राऊत यांच्या विधानामुळं वादंग

Sanjay Raut Criticism: संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संजय राऊत यांनी टीका केली आहे.

Amit Ujagare

Sanjay Raut: महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा २०२४ दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झाल्यानंतरही यावरुन अद्याप वाद थांबताना दिसत नाही. त्यातच संभाजी ब्रिगडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला आणि शाईफेक झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत चांगलेच भडकले आहेत. महाराष्ट्रात हा कायदा लागू झाल्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जरी पोलिसांवर असली तरी पोलीस हे फडणवीसांचं ऐकणार आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे. तसंच या पोलिसांना त्यांनी खाकी वर्दीतले अतिरेकी आणि नक्षलवादी असंही संबोधलं, त्यामुळं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

राऊतांनी नेमकं काय म्हटलंय?

प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्याप्रकरणी बोलताना राऊत म्हणाले, या हल्ल्याशी भाजपचा संबंध आहे, हे जे आरोपी आहेत त्यांचे सगळ्यांचे भाजप नेत्यांसोबतचे व्हिडिओ आणि फोटो बाहेर आले आहेत. महाराष्ट्रात तुम्ही डाव्या विचारसरणीवरती दोष देत आहात, डावी विचारसरणी अमुक आणि तमूक मग काल प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला झाला ज्या पद्धतीने हल्ला झाला ही भारतीय जनता पक्षाने पोसलेले डावेच होते. आता या लोकांवर सुरक्षा कायदा लावणार आहात का? महाराष्ट्रात कुठेही कोणाला मारत आहेत हे गुंड. सामाजिक कार्यकर्त्याला आणि राजकीय कार्यकर्त्याला आता बाहेर फिरायला भीती वाटते. कार्यकर्त्याला भाजपच्या गुंड टोळ्या कधी कोणावरती हल्ला करतील सांगता येत नाही. महाराष्ट्राचा 'गुंडराष्ट्र' करून टाकला आहे फडणवीस यांच्या राज्यात.

फडणवीसांनी खाकी वर्दीतले नक्षलावदी पोसलेत

जसं आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांवरती पीएमएलए कायद्याअंतर्गत खोटे गुन्हे दाखल केले, घोटाळ्यांशी संबंध जोडले गेले. तसंच बनावट पद्धतीनं तोच हा 'जनसुरक्षा कायदा' आहे. तुमच्या सरकारमध्ये एवढी हिंमत आहे? एवढे पोलीस पोसलेले आहात खाकी वर्दीतले तुम्ही अतिरेकी पोसलेले आहेत. खाकी वर्दीतले नक्षलवादी तुमच्याकडे आहेत, ते कोणाचाही संबंध कोणाशी जोडतील. देवेंद्र फडणवीस यांनी राज्य कसं करावं आणि कसं केलं जातं? हे जेवढं त्यांना माहिती आहे हे तेवढं माझ्यासारख्या माणसाला कधीच सत्ता न भोगलेल्या माणसाला ते सत्ता कशी भोगताहेत हे मी सांगू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT