Mumbai News :
युक्रेनमध्ये रायगडमधील एका तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेने तिच्या आईला मोठा धक्का बसला. त्यातही लेकीचे अंत्यदर्शन तरी होते की नाही, या काळजीत तीची आई होती. मात्र, उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या प्रयत्नामुळे मुलीचे पार्थिव मायदेशी आणण्यात आले. अखेर तिच्या आईला लेकीचे अंत्यदर्शन घेता आले. मनाला चटका लावणारी अशी ही घटना आहे.
प्रचिती पवार ही मूळची रायगड जिल्ह्यातील रोहा येथे राहणारी मुलगी. प्रचितीचे वडील मुंबई पोलिस दलात होते. दहा वर्षांपूर्वी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. युक्रेन येथे एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात ती शिकत होती. केसपुळीचे निमित्त झाले आणि सेफ्टीक होऊन तिचा 2 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. या घटनेने आई देवयानी पवार आणि मामा डॉ. तेजकुमार अपनगे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.
लेकीचा विदेशात मृत्यू झाल्याने तिचे पार्थिव मायदेशात कसे आणायचे? असा प्रश्न आईसमोर होता. लेकीचे अंत्यदर्शन तरी होते की नाही? या विचाराने आईचे अश्रू थांबत नव्हते. लेकीला एकदा शेवटचे पाहता यावे, अशी एकच इच्छा होती. यासाठी त्यांच्या एका परिचिताने देवेंद्र फडणवीस यांना मेसेज केला. याची दखल फडणवीस यांनी घेतली.
फडणवीस यांनी तातडीने सूत्रे फिरवली. आपले खासगी सचिव दिलीप राजूरकर आणि दिल्लीतील स्वीय सहायक मनोज मुंडे यांना सूचना केल्या. फडणवीस स्वतः परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्याशी बोलले. परराष्ट्र मंत्रालय आणि युक्रेनमधील भारतीय दूतावास यांच्याशी संपर्क साधून दिला. यानंतर प्रचितीचे पार्थिव मायदेशी आणण्याची मोहीम हाती घेण्यात आली. फडणवीस स्वतः यात बारकाईने लक्ष देऊन होते. आवश्यक सूचना करत होते. सर्व अडचणी दूर करत अखेर प्रचितीचे पार्थिव मुंबई विमानतळावर पोहोचले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रचितीचे पार्थिव 14 फेब्रुवारी रोजी रोहा येथे पोहोचविण्यात आले. काल तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. युक्रेनपासून दिल्लीपर्यंत सर्व यंत्रणांशी फडणवीस यांनी संपर्क केल्यामुळे एका आईला लेकीचे अंत्यदर्शन घडू शकले. याबद्दल प्रचितीच्या कुटुंबीयांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.