Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपावर मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या दिल्लीवारी सुरू आहेत. यातच राज्यात लोकसभेच्या पार्श्वभूमिवर मनसेलाही सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यावर आता फडणवीसांनीही सूचक वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
निवडणुकीत होणाऱ्या युतीच्या चर्चेवर मनसे आणि भाजपच्या नेत्यांनी सस्पेन्स ठेवला असला तरी त्यांच्या मौनाकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मनसेच्या नाशिकमधील मेळाव्यात निवडणुकीत काय निर्णय घ्यायचा, यावर लवकरच भूमिका स्पष्ट करण्यात येईल. मात्र, तोपर्यंत संयम ठेवण्याचे आवाहन ठाकरेंनी मनसैनिकांना केले आहे. यानंतर फडणीसांनी मनसे आणि आमच्या भूमिकेत फारसे अंतर नाही, असे म्हणत भविष्यातील युतीचे संकेत दिले आहे.
फडणवीस नेमके काय म्हणाले ?
मनसेनी जी काही व्यापक भूमिका घेतलेली आहे ती काही आमच्या भूमिकेशी विसंगत नाही. महाराष्ट्रात राहून मराठी माणसांबद्दल बोलणे हे योग्यच आहे. मराठी माणसांचे सर्व अधिकारी प्रोटेक्ट केलेच पाहिजेत. क्षेत्रीय अस्मिता आम्हाला मान्यच आहे, असे स्पष्ट मत देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) व्यक्त केले.
मनसेने (BJP) मराठी माणसांच्या सोबत आता हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे त्यांच्या आणि आमच्या भूमिकेत फारसे अंतर राहिलेले नाही. मात्र, निवडणुकीत काय कारायचे यावर लगेच निष्कर्ष काढता येणार आहे. तो भाग चर्चा आणि तपशिलाचा आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य भूमिका घेतली जाईल, असे सूचक विधान फडणवीसांनी केले आहे.
सध्या राज्यातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Mahayuti) लोकसभेच्या जागावाटपावरून खडाखडी सुरू आहे. जागावाटपाचा तेढ सोडवण्यासाठी भाजपच्या दिल्लीश्वरांनी मध्यस्थी केली तरी महायुतीतील एकवाक्यता होताना दिसत नाही. त्यामुळे या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठकांवर बैठका होताना दिसत आहेत. यातच फडणवीसांनी लोकसभेच्या तोंडावर मनसेबाबत केलेल्या विधानाने युतीत आणखी एका पक्षाची भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता येणाऱ्या काळात मनसे युतीचा भाग होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.