Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis Big Breaking : मोठी बातमी: फडणवीस सरकारमधून मोकळे होणार?

Lok Sabha Constituency 2024 :राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत मी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे ते म्हणाले.

Rashmi Mane

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार टक्कर देणाऱ्या भाजपलाच धक्के बसल्याचे निकालाच्या आकडेवारीने दाखवून दिले. या निकालात ठाकरे-पवार आणि काँग्रेस 30 जागा खेचल्याने भाजप आणि मित्रपक्षांच्या नेतृत्वाला डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.

विशेषतः महाराष्ट्रात कागदावर प्रचंड ताकद असूनही भाजपला जेमतेम 9 जागा मिळाल्याने प्रदेश संघटनेत बदल होण्याचे संकेत दिले गेले. तेवढ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच आता सरकारमधून म्हणजे, उपमुख्यमंत्रीपदावरून मोकळे करण्याची अपेक्षा पक्ष नेतृत्वाकडे मांडली.

गंभीर म्हणजे, जो काही पराभव झाला आहे. त्याची जबाबदारी माझी आहे. ती स्वीकारतो, अशी कबुलीही फडणवीसांनी दिली. मला पुढच्या विधानसभा निवडणुकीसाठी सरकारमधून मोकळे करावे, अशी विनंती पक्ष नेतृत्त्वाला करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मी हार मानणारा नाही. मी ताकदीने लढणार असल्याचे सांगून विरोधकांशी दोन हात करीत राहणार असल्याचाही निर्धार त्यांनी केला. निकालानंतर काही तासांतच फडणवीसांनी ही भूमिका मांडल्याने राजकीय वर्तुळ हादरले आहे.

'मला सरकारमधून मोकळे करण्याची विनंती दिल्लीतील नेतृत्वाकडे असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे भाजपच्या वर्तुळात उलटसुलट चर्चा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक 28 उमेदवार दिले होते. निवडणुकीआधी सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांना फोडून, फडणवीसांनी अनेक नेत्यांना भाजपमध्ये आणले. तरीही, ठाकरे-पवारांना प्रचंड सहानुभूती असल्याचे चित्र दिसून आले.

या निवडणुकीत भाजपची पुर्ण वाताहत झाली असून, मागील निवडणुकीत २३ जागा जिकंलेल्या भाजपला 9 जागांवर समाधान मानावे लागले. ही मोठी पडछड आहे. या निकालाचे विश्लेषण करून, त्यावर मीडियापुढे आपली बाजू मांडण्यासाठी फडणवीसांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली.

या परिषदेतील निवडणुकीत उमेदवार, मते, त्यांची टक्केवारी मांडून भाजप अजूनही उजवा असल्याचे फडणवीसांनी दाखवून दिले. काही ठिकाणी कमी पडल्याची कबुलीही त्यांनी मात्र. या पुढच्या काळात उपमख्यमंत्रीपदावरून मोकळे करण्याची अपेक्षा मांडली. एकाकी अशी अपेक्षा बोलून दाखविल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT