मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat singh Koshiyari) हे राज्यपालांना भेटताच राज्य विधानसभेचे येत्या 30 जून रोजी सकाळी 11 वाजता अधिवेशन बोलविण्यात आल्याचे एक चुकीचे पत्र व्हायरल झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या दिवशी विश्वासमत सिद्ध करावे, अशी सूचना राज्यपालांनी यात केली होती. मात्र हे पत्र खोटे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या पत्रावर राज्यपालांची सही नव्हती. त्यामुळे त्या पत्राच्या अधिकृतपणाबद्दल शंका व्यक्त होत होती. तरीही फडणवीस हे राज्यपालांना भेटल्यानंतर ठाकरे सरकारचा पाडाव करण्यासाठीचे नियोजन ठरवून आले असल्याची चर्चा आहे. विश्वासदर्शक ठरावासाठी राज्यपाल आज किंवा उद्या अधिवेशन बोलविण्याची सूचना मुख्यमंत्र्यांना देऊ शकतात, अशी शक्यता आहे.
फडणवीस यांनी रात्री साडेनऊच्या सुमारास राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर तातडीने घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राज्यपाल आज ना उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची शक्यता आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर पहिल्यांदाच भाजपने आज उघडपणे आपली भूमिका राज्यपालांकडे मांडली. काही अपक्ष आमदारांनी राज्यपालांकडे सरकार अल्पमतात आल्याचा दावा केला होता. तसेच सर्वोच्च न्यायालयात काल झालेल्या सुनावणीत एकनाथ शिंदे यांनीही ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचे नमूद केले होते. त्यानुसार फडणवीस यांनी सरकार अल्पमतात आल्याचे राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले.
राज्यपाल आता काय आदेश देणार, याची उत्सुकता आहे.आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा ठाकरे यांनी केला आहे. तसेच जे बंडखोर आमदार गुवाहटी येथे आहेत, ते मुंबईत विशेष अधिवेशनासाठी येणार का, याची उत्सुकता आहे. तसेच ज्या 16 बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे का त्यांना मतदानाची संधी मिळणार का, याचेही औत्सुक्य राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.