Mumbai News : मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात कट रचण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तीन नेत्यांची नावे उघड केली आहेत. या प्रकरणातील आरोपींच्या संपर्कात थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक होते, अशी माहिती फडणवीसांनी सभागृहात दिली.
विधानसभेत मंगळवारी बोलताना फडणवीस यांनी जयकुमार गोरे यांच्या प्रकरणाचा मुद्दा काढला. यावेळी बोलताना त्यांनी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि प्रभाकर देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, राजकारण करत असताना कुणाला जीवनातून उठवायचं, अशाप्रकारच्या हेतूनं राजकारण होत असेल तर ते योग्य नाही. गोरे यांच्याविरोधातील केस 2016 मध्ये झाली, 2019 मध्ये संपली. त्यानंतर अचानक हे उकरून काढायचं, अशाप्रकारचा विषय झाला.
गोरे यांना लाचेची मागणी झाल्यानंतर पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार केली. त्यानंतर ट्रॅप लावला. यामध्ये सगळा संवाद, मागणी टेप झाली. पोलिसांची खात्री पटल्यानंतर आरोपीला पकडण्यात आले. हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता. यामध्ये संबंधित महिला, तुषार खरात आणि अनिल सुभेदार या तिघांना अटक झाली आहे. या सगळ्यांनी मिळून हा कट रचला, याचे सगळे पुरावे सापडले आहे. त्यांचे व्हॉट्सअप संवाद, फोन, कसा कट रचला हे सापडले, असे फडणवीसांनी सांगितले.
दुर्देवाची गोष्ट ही आहे की, यामध्ये थेट यासर्वांशी संपर्कात थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक होते. पुराव्यानिशी सांगतो. प्रभाकरराव देशमुख हे थेट यामध्ये शंभरवेळा तिन्ही आरोपींशी बोलले आहेत. त्यांच्याकडे व्हिडीओ गेले आहेत. त्याहीपेक्षा मला याचे वाईट वाटते, मी त्यांच्यावर आरोप करत नाही, त्यांनी याचं आत्मचिंतन केलं पाहिजे.
सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरातशी आणि व्हिडीओही यांना पाठवले आहेत. आता याची चौकशी होईल, असे फडणवीस म्हणाले. कुठेतरी हे चालले काय आहे. आपण राजकीय शुत्र नाही, राजकीय विरोधक आहोत. अशाप्रकारे कुणाल जीवनातून उठवून टाकायचं, अशाप्रकारचे षडयंत्र होत असेल, तर हे चुकीचे आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.