Devendra Fadnavis
Devendra Fadnavis  sarkarnama
मुंबई

सोमय्यांवरील हल्ल्यानंतर फडणवीस म्हणाले,'जशास तसे उत्तर देणार'

सरकारनामा ब्युरो

मुंबई :भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya ) यांच्या गाडीवर काल (शनिवारी) रात्री दगडफेक झाली. किरीट सोमय्या हे खार पोलीस ठाण्यात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची भेट घेण्यासाठी जात असताना ही घटना घडली. शिवसेनेच्या गुंडांनी हा हल्ला केला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. या घटनेवर भाजपचे नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis )यांनी महाविकास आघाडी सरकार व पोलिसांवर टीका केली आहे.

"पोलिसांनी सीएम उद्धव ठाकरेंच्या गुंडांना पोलीस स्टेशनबाहेर जमू दिलं. मी बाहेर आल्यावर त्या गुंडांनी माझ्यावर दगडफेक केली. गाडीच्या काचा फोडल्या. यात मी जखमी झालो असून पोलिसांच्या उपस्थितीतचं मला मारहाण केली." असे टि्वट सोमय्यांनी केलं आहे, तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले की, किरीट सोमय्यांनीच शिवसैनिकांवर गाडी घातली.

''खासदार नवनीत राणा यांना भेटण्यासाठी पोलिस ठाण्यात येतोय, हे किरीट सोमय्या यांनी पोलिसांना कळविले होते. त्यांना झेड प्लस सुरक्षा आहे. हल्ला होणार, हे सुद्धा त्यांनी आधीच पोलिसांना सांगितले होते. असे असताना पोलिसांनी खबरदारी घेतली नाही.पोलिसांच्या मदतीने ही गुंडगिरी सुरू आहे,''असे टि्वट फडणवीस यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ''या घटनेने मुंबई पोलिसांची अब्रू या पोलिसांनी घालविली आहे.हा प्रकार अतिशय गंभीर आहे. या प्रकरणात कठोर कारवाईची आमची गृहमंत्री आणि गृहसचिवांकडे मागणी आहे. आम्ही घाबरून जाऊ असे समजू नका. जशाच तसे उत्तर उत्तर देण्याची आमचीही क्षमता आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे ,''

किरीट सोमय्या काल रात्री खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस स्टेशनला गेले होते. यावेळी किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. किरीट सोमय्या परत जात असताना खार पोलीस स्टेशनबाहेर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी मोठा दगड फेकला. यात त्यांच्या गाडीची काच फुटून काचांचे तुकडे त्यांच्या हनुवटीवर लागले. पुण्यात झालेल्या हल्ल्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्यांवरती दुसऱ्यांदा हल्ला केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT