Devendra Fadnavis On NCP  Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis On NCP : 'आमच्या अजितदादांना पक्ष अन् घड्याळ...'; फडणवीसांकडून अभिनंदन!

NCp Crisis News : "सर्व सहकारी तसेच कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन..."

Chetan Zadpe

Mumbai News : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? यावर मोठा निर्णय दिला आहे. आयोगाने आज बुधवारी (ता.7) राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आणि चिन्हाबाबत मोठा निकाल दिला. हा निकाल म्हणजे शरद पवार गटाला मोठा धक्का आहे. आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवारांना बहाल केले आहे. यावर आता दुसरे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले, “आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच घड्याळ चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली. मी त्यांचे, सर्व सहकारी तसेच कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, अशी सूचक प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.

अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया -

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘आमच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून निवडणूक आयोगाने आमच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्याचे आम्ही नम्रपणे स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले, “निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. कोणत्याही राजकीय पक्षासाठी निवडणूक चिन्ह महत्त्वाचे असते. उद्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. यात आमचे काही म्हणणे नाही.”

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT