मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर ते अॅक्शन मोडवर आले आहेत. काल संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह बैठक पार पडल्यानंंतर फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मंत्रालयात त्यांच्या कार्यलयात कामकाजाचा आढावा घेतला. तसेच ओबीसी आरक्षणासंदर्भात आज मंत्रालयात एक बैठक घेऊन संपूर्ण आढावा घेतला आणि पुढील कार्यवाहीसाठी निर्देश दिले.
दरम्यान, आजच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांनी सामान्य जनता आणि उपमुख्यमंत्र्यांमधील अंतर कमी करण्याचे प्रयत्न केला. फडणवीसांनी आज त्यांच्या कार्यालयाची पाहणी केली आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातील कोविड बॅरियर काढण्याच्या सुचना केल्या. त्यानंतर सर्व बॅरियर काढण्यात आले. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच हे बॅरिअर लावण्यात आले होते. मात्र यामुळे उपमुख्यमंत्र्यांना भेटायला आलेल्या जनतेला थेटपणे भेटता येत नव्हते, बोलता येत नव्हते.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने १६ मार्च २०२० रोजी एक आदेश काढून सर्वसामान्यांच्या मंत्रालयातील प्रवेशावर निर्बंध लागू केले होते. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पुढे मंत्रालयासह शासकीय कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थितीही मर्यादित ठेवण्यात आली. मंत्रालयाबाहेरील शासकीय अधिकाऱ्यांना प्रवेश बंद करण्यात आला. केवळ अतिमहत्त्वाच्या व तातडीच्या बैठकीसाठी त्यांना मंत्रालयात प्रवेश दिला जात होता.
शिवाय सर्व मंत्री, सचिव आणि अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कोविड बॅरिअर लावण्यात आले होते. मात्र आता राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे १८ मे पासून पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश देण्याची प्रवेश पत्रिका पद्धती सुरू करण्यात आली आहे. तसेच आता उपमुख्यमंत्र्यांच्या दालनातील कोविड बॅरिअर निघाले असून आगामी काही काळात मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, सचिव आणि अधिकारी यांच्या कार्यालयातीलही कोविड बॅरिअर निघतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.