Devendra Fadnavis, Sanjay Raut sarkarnama
मुंबई

राऊतांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, सिंह कधी गिधाडाच्या धमकीला घाबरत नाही...

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले आहे.

सरकारनामा ब्यूरो

पणजी : शिवसेना (Shivsena) नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या आरोपांना विधानसेभेतील विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले आहे. राऊतांनी केलेल्या आरोपांना उद्देशून सिंह कधी गिधाडांच्या धमक्यांना घाबरत नाही. संजय राऊत हे रोज सकाळी करमणूक करतात, अश्या शब्दात त्यांनी राऊतांच्या आरोपांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते गोव्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

फडणवीस म्हणाले, मोदींच्या सरकारमध्ये कुणाचाही बळी दिला जात नाही. राऊतांनी व्हिक्टिम कार्ड खेळणे सोडून दिले पाहिजे. राऊतांचे वक्तव्य हे हेडलाईनसाठी आहे. ते संपादक आहेत. कोणत्या वक्तव्याची बातमी होणार हे त्यांना माहिती असल्याने ते अशी वक्तव्य करत आहेत. सिंह गिधाडांच्या धमक्यांना घाबरत नाही, ते रोज सकाळा लोकांचे करमणूक करत असतात. त्यांच्या या करमणूकीवर आम्ही जास्त बोलावे असे मला वाटत नाही, अश्या शब्दात त्यांनी राऊतांना पुन्हा डिवचले आहे.

राऊत यांनी काल (ता.8 फेब्रवारी) उपराष्ट्रपतींना पत्र लिहित लेटर बॉम्ब टाकला होता. आज सकाळी त्यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत त्याहून मोठा बॉम्ब टाकला. राऊत म्हणाले, मला जे काही सांगायचं ते फडणवीसांना चांगलचं कळतय. राजकीय स्वार्थासाठी तपास यंत्रणांचा वापर करुन विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या मुलीच्या लग्नातील मंडपडेकोरेटर, कंत्राटदारांना बंदूकीचा धाक दाखवून त्यांच्याकडून चौकशी केली गेली. त्यांना धमकावले जात आहे. मी त्यांना पैसे दिल्याचे त्यांनी लिहून दिले नाही तर त्यांना अटक करण्याची धमकी दिली गेली. आज महाराष्ट्रात ईडीकडे सर्वाधिक केसेस आहेत. ईडीच्या नावावर वसुली सुरु आहे.

ईडीच्या कार्यालयात बेकायदेशीर लोक बसतात. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन विरोधी पक्षनेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करायचे व त्यांचा आवाज दाबायचा. त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवायचे आणि सरकारे पाडायची, हे जे सुरु आहे, त्याला आम्ही जुमानत नाही, तसेच, माझी अवस्था अनेक वर्षे जेलमध्ये काढलेल्या रेल्वेमंत्र्यांप्रमाणे करु अशी धमकीही मला देण्यात आली. मात्र, ते भ्रमात आहेत. तपास यंत्रणा क्रिमिनल सिंडीकेट च्या भाग झाल्या आहेत. भाजप नेते, अनिल देशमुखांच्या पाठोपाठ तुम्हालाही त्यांच्या बाजूच्या कोठडीत पाठवू, अशा धमक्या देत आहेत. पण याद राखा, जर आम्ही कोठडीत गेलो तर तुम्हालाही त्याच कोठडीत आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही राऊतांनी दिला आहे.

दरम्यान, राऊतांनी केलेल्या आरोपावरून महाविकास आघाडीच्या नेते आणि भाजप नेत्यांमध्ये चांगल्याच शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आहेत. यावर बोलतांना राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ईडीच्या कारस्थाना पाठीमागे फडणवीसांचा हात असल्याचा आरोप केला तर, राज्याचे पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरेंनी सुद्धा राऊतांचे पत्र हे बोलके असल्याचे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT