Mumbai News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्वाचित पंतप्रधानपदाची सलग 12 वर्षे पूर्ण केली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे 4398 दिवस त्या पदावर होते. आता मोदी यांनी त्यांची तिसरी टर्म सुरू असतानाच 4399 दिवस पंतप्रधान पदाची जबाबदारी सांभाळतानाच नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यानंतर पंडित नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात येत आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राज्यसभा खासदार शरद पवार यांनी मुंबईत वाय.बी.चव्हाण सेंटरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांची पंडित नेहरू यांच्याशी तुलना होऊ शकत नसल्याचं म्हटलं होतं. यावर आता भाजपकडून प्रतिक्रिया आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 12 वर्षांची कारकीर्द पूर्ण केल्याच्या धर्तीवर शुक्रवारी (ता.12) पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी फडणवीस आणि शरद पवार यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी नेहरू आणि मोदी यांच्यात कुठलीही स्पर्धा नाही. खरं तर केवळ हा रेकॉर्डचा भाग असल्याचं म्हटलं आहे.
फडणवीस म्हणाले, देशामध्ये इलेक्टेड,निर्वाचित पंतप्रधानांमध्ये नेहरूजींचा एक रेकॉर्ड होता.ते 4398 दिवस होते. मोदीजी आता 4399 दिवस झालेत आणि पुढे ते राहणार आहेत. याच्या व्यतिरिक्त नेहरूजींच्या काळात नेहरूजींनी जे केलं ते आपल्याला माहिती आहे. मोदीजींच्या काळात मोदीजींनी जे केलं ते आपल्याला माहिती असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
त्यामुळे मोदी आणि नेहरु यांच्यात तुलना करायचा विचारच नाहीये. विषय नाहीये. मुळामध्ये नव्या भारताच्या निर्मितीमध्ये मोदीजींचं जे स्थान आहे, ते अढळ आहे. त्यामुळे मी कोणाशी तुलना करू इच्छित नाही. तुलना करण्याचं कारण नसल्याची स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री फडणवीस मांडत एकप्रकारे शरद पवारांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शरद पवार नेमकं काय म्हणालेत, ते मी ऐकलं नाही. त्यांचं भाषणही ऐकलं नाही, त्यामुळे तुम्ही अर्धवट गोष्ट सांगून माझी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न कराल, ती गोष्ट योग्य नसल्याचा टोलाही लगावला होता.
ते म्हणाले, मात्र,एक गोष्ट निश्चितपणे सांगतो,ज्याप्रकारे शिखांवर काँग्रेसने अत्याचार केला, त्याचा निषेध हा जन्मभर आम्ही करू,शेवटपर्यंत आम्ही करू, ज्या प्रकारे कतले आम शिखांचा या दिल्ली, पंजाब आणि संपूर्ण भारतामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात झालेला आहे, हे सत्य आहे. ते सत्य कोणालाही विसरता येणार नाही, अशी टीकाही फडणवीस यांनी काँग्रेसवर केली आहे.
शरद पवार यांनी नेहरूंबाबत स्पर्धा लावली जात आहे,पण तशी काय होऊ शकते असा सवाल उपस्थित करत भाजप नेत्यांवर निशाणा साधला होता. याचवेळी आपल्याला नेहरूंनी इंग्रजांच्या अत्याचारातून मुक्त करण्याचं काम केलं, हे आपण विसरू शकत नसल्याचं मतही व्यक्त केलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.