Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' विधानाने ठाकरे गटाची हवागुल?

सरकारनामा ब्यूरो

Devendra Fadnavis News : शिवसेनेमध्ये फुट पडल्यानंतर खरी शिवसेना (Shivsena) कोणाची याचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुरु आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळावे म्हणून उद्धव ठाकरे (uddhav thackeray) व शिंदे गटामध्ये चढाओढ सुरू आहे. दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत. ठाकरे यांनीही निवडणूक आयोगाला 11 लाखाहून अधिक प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत.

आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रांचा फॉरमॅट चुकल्याने अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद झाल्याची सूत्रांची माहिती आहे. हे वृत्त समोर अल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी या प्रतिज्ञापत्रावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फडणवीसांच्या ठाकरे गटाची हवाच गुल झाल्याचे सांगितले जात आहे.

फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिज्ञापत्रावरून मोठे विधान केले. फडणवीस म्हणाले, कोण कशाच्या बातम्या करते मला माहीत नाही. निवडणूक आयोगाकडे अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्रे लागत नाही. एखाद्या पक्षाला मान्यता द्यायची किंवा चिन्ह द्यायचे निवडणूक आयोगाचे नियम ठरलेले आहे.

गेल्या 20 वर्षात वेगवेगळ्या निवडणूक आयुक्तांनी दिलेले निर्णय हे प्रमाण आहे. त्यामुळे कुणाचे प्रतिज्ञापत्रे किती आहे, कुणाचे प्रतिज्ञापत्र रद्द झाले. कुणाचे टिकले हे सर्व स्वत:च्या समाधानासाठी चालले असल्याचा टोला त्यांनी लगावला. मात्र, फडणवीसांच्या या विधानामुळे ठाकरे गटाची धाकधूक वाढली आहे. फडणवीसांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, फडणवीस यांनी महापालिका निवडणुकांबाबतही भाष्य केले. न्यायालयाच्या निकाला त्यानुसार निवडणुका होतील. निवडणुका कधी घ्यायच्या याचा अधिकार निवडणूक आयोगाचा, असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT